कडेगाव : कडेगाव नगरपंचायतसाठी ८ प्रभागात तिरंगी, चार प्रभागात चौरंगी तर एका प्रभागात दुरंगी लढतीचे चित्र अर्ज माघारीनंतर स्पष्ट झाले. येथे प्रामुख्याने सत्ताधारी काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी असा तिरंगी सामना होत आहे. शिवसेना तीन ठिकाणी तर अपक्ष दोन ठिकाणी निवडणूक लढवित आहेत. राष्ट्रवादी ११ ठिकाणी निवडणूक लढवीत आहे.कडेगाव नगरपंचायतच्या १३ जागांसाठी ५२ उमेदवारांचे ५३ अर्ज दाखल होते. त्यापैकी १० उमेदवारांनी ११ अर्ज माघारी घेतले. त्यामुळे आता १३ जागांसाठी ४२ उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत.येथील प्रभाग क्रमांक १, ३, १२ आणि १७ मध्ये ओबीसी आरक्षण आले होते. तेथील निवडणूक रद्द झाली आहे. अन्य १३ प्रभागात निवडणूक होणार आहे.निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाल्याने प्रचाराच्या रणधुमाळीला सुरूवात होणार आहे. सत्ताधारी काँग्रेसचे नेते राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख येथे सत्तांतरासाठी प्रयत्नशील आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्क कार्यालयाच्या निमित्ताने कडेगाव येथे येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि ताकदीने लढा असे सांगितले. त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.
प्रभागनिहाय उमेदवार व कंसात पक्ष -प्रभाग क्रमांक २:पांडुरंग घाडगे (राष्ट्रवादी), राहुल चन्ने (शिवसेना), किशोर मिसाळ (भाजप ), सागर सकट (काँग्रेस)प्रभाग क्रमांक ४ : सविता जरग (राष्ट्रवादी), अमीना पटेल (काँग्रेस), नाजनीन पटेल(भाजप)प्रभाग क्रमांक ५ : अक्षय देसाई (राष्ट्रवादी), विश्वास व्यास (भाजप), विजय शिंदे (काँग्रेस)प्रभाग क्रमांक ६:दत्तात्रय देशमुख (राष्ट्रवादी), धनंजय देशमुख (भाजप), अनिल देसाई (शिवसेना), नामदेव रास्कर (काँग्रेस)प्रभाग क्रमांक ७ : शुभदा देशमुख (भाजप), शुभांगी देशमुख (काँग्रेस), छाया मोहिते (शिवसेना)प्रभाग क्रमांक ८ :प्रमोद जाधव (राष्ट्रवादी), अमोल डांगे (भाजप), पुरुषोत्तम भोसले (काँग्रेस), नितल शहा (अपक्ष)प्रभाग क्रमांक ९ :किरण कुराडे (राष्ट्रवादी), प्रशांत जाधव (काँग्रेस), विजय गायकवाड (भाजप)प्रभाग क्रमांक १०:निशा जाधव (राष्ट्रवादी), सीमा जाधव (काँग्रेस), मंदाकिनी राजपूत (भाजप)प्रभाग क्रमांक ११:अश्विनी देशमुख : (राष्ट्रवादी ), दीपाली देशमुख (काँग्रेस) नजमाबी पठाण (भाजप)प्रभाग क्रमांक :१३दीपा चव्हाण (भाजप), वनिता पवार (काँग्रेस), अनुजा लाटोरे (राष्ट्रवादी),प्रभाग क्रमांक १४ :ऋतुजा अधाते (काँग्रेस), विद्या खाडे (भाजप)प्रभाग क्रमांक १५ :प्रवीण करडे (अपक्ष) ,मनोजकुमार मिसाळ (काँग्रेस),बेबी रोकडे (भाजप),हरी हेगडे (राष्ट्रवादी),प्रभाग क्रमांक १६ :वनिता घाडगे (काँग्रेस), प्राची पाटील (राष्ट्रवादी), रंजना लोखंडे (भाजप )