मिरज : मिरजेत किरकोळ कारणातून झालेल्या वादावादीतून दोन कुटुंबांत हाणामारी व परस्परांना चावा घेण्याचा प्रकार घडला. शनिवारी सकाळी ११ वाजता झालेल्या या प्रकाराबद्दल आयेशा खान व शाबुल मैनुद्दीन शेख यांनी पोलिसात परस्परविरोधी फिर्याद दिली असून दोन्ही गटांच्या दहा महिलांसह ११ जणांविरुद्ध मिरज शहर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयेशा खान यांनी घरासमोर खरकटे टाकल्याच्या कारणावरून शाबुल शेख यांच्याशी वाद झाला. यावेळी वादावादीतून शाबुल शेख, रयिसा शेख, रिजवाना, सुबाना जमादार, जहांगीर मुलाणी यांनी आयेशा खान यांना मारहाण केल्याची व हाताचा चावा घेतल्याची तक्रार आहे. तर, नक्कल केल्याचा जाब विचारल्याने महेजाबीन जमादार, युनूस खान, जैनबुल शेख, जुबेदा जमादार, आदिशा जमादार, आयेशा खान यांनी मारहाण केली असल्याचे शाबुल शेख यांनी तक्रारीत म्हटले आहे. याबाबत मिरज शहर पोलिसात नोंद आहे.
----------------