याबाबत युगंधर यशोदत्त कुरणे (वय २७, रा. सिद्धार्थ परिसर) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, रोहित हणमंत शिवशरण (२७, रा. आंबेडकरनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कुरणे व त्याचा मावस भाऊ वीर जयकर हे गोंधळे या मित्रासोबत गॅरेजसमोर बोलत थांबले होते. यावेळी रोहित शिवशरण याने गोंधळे याला जुन्या वादातून शिवीगाळ केली. यावेळी कुरणे याने शिवीगाळ करू नकोस, असे समजाविले असता शिवशरणने त्याला हाताच्या ठोशाने मारहाण केली. यात त्याच्या भुवईला दुखापत झाली आहे,
तर रोहित शिवशरण याने युगंधर कुरणे, दादा विवेक गोंधळे, पंचशील जयकर व एका अनोळखी तरुणाविरुद्ध तक्रार दिली आहे. रोहित हा गॅरेजमध्ये बसला असता युगंधर कुरणे याने त्याला धक्काबुक्की करून खाली पाडले, तर उर्वरितांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे.