ही घटना रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडली.
पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की,
ढालगाव येथील खंडोबा मंदिर परिसरात शनिवारी आयपीएलचा मुंबई विरुद्ध चेन्नई असा सामना होता. तो शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास संपला. मुंबईने सामना जिंकला म्हणून काहीजण फटाके वाजवत होते. मात्र, रात्री लोक झोपलेले आहेत, म्हणून फटाके वाजवण्यास नवनाथ मलमे यांनी विरोध केला. यातून बाचाबाची झाली. याच भांडणाचे परिवर्तन रविवारी रात्री पावणेआठच्या सुमारास मोठ्या भांडणात झाले.
नवनाथ मलमे, सदानंद ऊर्फ सोमनाथ उत्तम मलमे (वय २३), समाधान दादासाहेब मलमे (२८), सुनील उत्तम मलमे (२६), विशाल मनोहर मलमे (२३), महेश शिवराम मंडले (२५, सर्व रा. ढालगाव) यांना श्रीकांत कोंडीबा बंडगर (३०, रा. डोर्ली, ता. जत), बिरू पांडुरंग कोळेकर (२८ रा. आरेवाडी), सागर पांडुरंग मंडले (२४), सागर प्रकाश चव्हाण (२४), कृष्णा अंकुश चव्हाण (२६), चैतन्य अनिल चव्हाण (२४), विशाल अनिल चव्हाण (२२), किरण अनिल चव्हाण (२०), शशिकांत पांडुरंग मंडले (२५), आकाश प्रकाश मलमे (२६), साहिल मौला पटेल (२५), विकास प्रकाश मलमे (२४, सर्व रा. ढालगाव), ऋतिक श्रीमंत मोहिते (२०, रा. जुनोनी) यांनी मारहाण केली. त्यातील पाचजणांना कवठेमहांकाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.