व उचल वसूल व्हावी, अशी मागणी कडेगाव तालुका ऊस वाहतूक कंत्राटदार संघटनेने केली आहे.
येथील प्रांताधिकारी कार्यालयात ऊस वाहतूक कंत्राटदार संघटनेने प्रांताधिकारी डॉ. गणेश मरकड
यांना निवेदन सादर करून गंडा घालणाऱ्या मुकादमांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की, साखर कारखान्यांना ऊसतोडीसाठी मजूर पुरविण्यासाठी आम्ही लाखो रुपयांची उचल देऊन मुकादम व ऊसतोड मजूर टोळ्यांशी करार केलेले होते; मात्र आता कारखाने सुरू होऊन दोन महिने झाले तरी मुकादमांनी कराराप्रमाणे ऊसतोड मजुरांचा पुरवठा केला नाही. आम्ही चेकने किंवा एनईएफटी करूनच पैसे दिले आहेत, तरीही मुकादमांनी फसवणूक केली आहे. यामुळे आम्ही कर्जबाजारी झालो आहोत. यामुळे संबंधित मुकदमांवर गुन्हे दाखल व्हावेत व उचल परत मिळावी.
यावेळी डी. एस. देशमुख व ऊस वाहतूक कंत्राटदार उपस्थित होते.
विश्वजित कदम यांच्याकडे दाद मागणार
सातारा जिल्ह्यात तेथील पोलीस अधीक्षकांनी गुंड प्रवृतीच्या व गंडा घालणाऱ्या मुकादमांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातही कार्यवाही व्हावी यासाठी आता कडेगाव तालुक्यातील वाहतूकदार कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना भेटून दाद मागणार आहेत.
फोटो ओळ : कडेगाव येथे प्रांताधिकारी
गणेश मरकड यांच्याकडे निवेदन देताना
डी. एस. देशमुख व ऊस वाहतूक कंत्राटदार.