सांगली व सातारा जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले असते. १९८९ पासून २००५ पर्यंत भोसले व मोहिते यांचा सत्तासंघर्ष, २०१० सभासदांना न रुचलेले मनोमीलन व त्यातून संस्थापक पॅनलचा झालेला उदय, २०१५ ला पुन्हा सत्ताबदल अशा अनेक राजकीय घडामोडी घडल्या.
यावेळी सत्ताधारी गटाकडून डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांनी प्रचाराचा जोर लावला आहे, तर संस्थापक पॅनलचे नेते माजी अध्यक्ष अविनाश मोहिते व रयत पॅनलचे नेते डॉ. इंद्रजित मोहिते यांनीही संपर्क दौऱ्याव्दारे सभासदांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रचार तोफा थंडावल्या आहेत. गुरुवारी पक्की मतदार यादी प्रसिध्द होत असून, निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच पुन्हा राजकीय हालचाही गतिमान होणार आहेत. सध्यातरी सत्ताधारी सहकार, संस्थापक व रयत पॅनल अशा तिरंगी लढतीचे चित्र आहे.