बुधवारपासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या कालावधीत आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी दिले आहेत. त्यानुसार वाहतूक शाखेने कारवाईचा वेग वाढविला आहे. वाहतूक शाखेच्या सहा. पोलीस निरीक्षक प्रज्ञा देशमुख यांनी संपूर्ण शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार ११५९ जणांवर कारवाई करतानाच त्यांच्या दोन लाख ४२ हजार २०० रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे, तर २८ दुचाकी व ८ चारचाकी अशी ३६ वाहने जप्त करण्यात आली आहेत. सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या व परवान्याचा भंग करणाऱ्या दोन रिक्षा व दोन मालवाहतूक वाहनांवर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.
ई-चलनाद्वारे दंड करूनही तो भरणाऱ्या वाहनधारकांकडूनही दंडाची वसुली करण्यात आली आहे.
कोट
पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याने विनाकारण कोणीही बाहेर फिरू नये. संचारबंदी आदेशासह वाहतूक नियमांचेही पालन करावे, अन्यथा नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
दीक्षित गेडाम, पोलीस अधीक्षक