शीतल पाटील ।सांगली : सुरत शहरात खासगी क्लासच्या इमारतीला लागलेल्या आगीत विद्यार्थ्यांचा बळी गेला. या घटनेनंतर सांगली महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या सक्षमतेवर चर्चा सुरू झाली. वास्तविक महापालिकेचा अग्निशमन विभाग अनेक संकटांशी मुकाबला करीत आहे. अपुरा मनुष्यबळाच्या आधारावर नागरिकांच्या सुरक्षेची स्वप्ने पाहिली जात आहेत. गेल्या पंधरा वर्षांत या विभागाकडे एकाही सत्ताधारी गटाने अथवा आयुक्तांनी फारसे गांभीर्याने पाहिलेले नाही. परिणामी कर्मचाऱ्यांअभावी हा विभागच संकटात सापडला आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरांची लोकसंख्या सहा लाखांच्या घरात पोहोचली आहे. पन्नास हजार लोकसंख्येमागे एक अग्निशमन बंब, त्यावर एका शिफ्टसाठी सहा कर्मचारी अशी सर्वसाधारण रचना अग्निशमन दलाची आहे. पण सांगलीचा विचार करता, शासनाच्या आदर्श नियमावलीलाही लाजवेल, अशी स्थिती आहे. सात अग्निशमन बंब, त्यावर काम करणारे ३४ कर्मचारी अशा कमकुवत आधारावर शहरात आपत्ती व्यवस्थापनाचे काम या विभागाला करावे लागत आहे. एक अग्निशमन केंद्राकडे एक स्टेशन आॅफिसर, तीन उपअग्निशमन अधिकारी, ३ प्रमुख अग्निशामक विमोचक, ६ वाहन-यंत्रचालक व २१ फायरमन असा ताफा आवश्यक आहे. पण सध्या तीन अधिकारी व ६७ कर्मचाऱ्यांच्या जिवावर सात अग्निशमन केंद्र चालविले जात आहे. एका गाडीमागे सहा कर्मचारी असे गणित घातले, तर एका शिफ्टसाठी किमान ४२ कर्मचाºयांची, तर तीन शिफ्टसाठी १२६ कर्मचाºयांची आवश्यकता आहे. त्यात कर्मचाºयांच्या साप्ताहिक सुटीचा विचार करता, आणखी २० ते ३० कर्मचाºयांची गरज आहे.अपुरी साधनसामग्रीसुरतमधील आगीनंतर मोठ्या इमारतीत दुर्घटना घडल्यास महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे असलेल्या अपुºया साधनसामग्रीची चर्चा रंगली आहे. सध्या अग्निशमन गाडीवरील शिडीची उंची केवळ दोन मजल्यापर्यंत मर्यादीत आहे. महापालिकेने आता दहा मजल्यापर्यंत बांधकामांना परवानगी सुरू केली आहे. त्यामुळे हा प्रश्न गंभीर झाला आहे.कर्मचारी भरती लाल फितीत!महापालिकेत कर्मचारी भरती बंद आहे. अग्निशमन विभागाने मानधनावर कर्मचारी नियुक्त करावेत, यासाठी फाईल तयार करून ती वरिष्ठांच्या टेबलापर्यंत पोहोचविली. पण या फायलीवरील धूळ काही हटलेली नाही. याचदरम्यान आरोग्य, बांधकाम, नगररचना या विभागात मात्र मानधनावरील कर्मचाºयांच्या नेमणुका करण्यात आल्या. त्यामुळे अग्निशमन विभागाबाबतच दुजाभाव कशासाठी? असा प्रश्न पडला आहे.सध्याची स्थिती...1अग्निशमनकडे ना शिपाई ना लिपिक2फायरमनच करतात सारी कामे3मोठ्या इमारतीतील दुर्घटनेशी मुकाबला करण्याची यंत्रणा नाही4सांगलीच्या वसंतदादा औद्योगिक वसाहतीतील केंद्र बंद5मिरज एमआयडीसीतील केंद्र केवळ दिवसाच सुरू, रात्री बंद6अवघे सात अग्निशमन बंब कार्यरतगेल्या अनेक वर्षात येथील कमतरतेबद्दल चर्चा झाली नाही.