शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' राजकारण्यांना खडे बोल सुनावले पाहिजेत; राज ठाकरेंचं मराठी साहित्यिकांना आवाहन
2
Mumbai Metro 3 Opens Today: मुंबईच्या पोटातून प्रवासाला सुरुवात, मेट्रो-३ मार्गिकेवरुन सुटली पहिली गाडी
3
हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांतरावर फडणवीसांचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले, "तुम्ही नवीन काय..."
4
भारताची 'पूजा' पाकिस्तानच्या क्रिकेटपटूशी विवाह करणार; लग्नाआधी इस्लाम धर्म स्वीकारणार
5
आपच्या खासदारावर ईडीची छापेमारी; फायनान्सरही कचाट्यात
6
"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला
7
देवीचे दर्शन करून घराकडे निघालेले कोल्हापुरातील दोन भाविक अपघातात ठार, दोघे गंभीर जखमी
8
४१००० मृत्यू, मोठा विध्वंस, तरीही हमासचे सैन्य मागे हटलेले नाही; १०१ इस्रायली अजूनही ओलीस
9
सणासुदीच्या काळात ₹10000 कोटी रुपयांची खरेदी करण्याच्या तयारीत गौतम अदानी? या बड्या कंपनीवर नजर?
10
"एक दिवस सगळं संपलं, शूटिंगवरुन घरी येते तेव्हा..."; अभिनेत्रीने आधी वडील गमावले मग आई
11
श्रीकांत शिंदेंचा विश्वासू शिलेदार उद्धव ठाकरेंकडे परतला; CM एकनाथ शिंदेंना धक्का
12
हृदयद्रावक! वडिलांबरोबर पोहायला गेलेला, नऊ वर्षांचा मुलगा पाण्यात बुडाला
13
"चिरंजीवाचे प्रताप वडिलांनी एकदा समजून घ्यावेत"; वर्षा बंगल्याचा उल्लेख करत राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर निशाणा
14
गायक अदनान सामींना मातृशोक, ७७ व्या वर्षी आईने घेतला अखेरचा श्वास
15
कुछ तो गडबड है दया! शिवाजी साटम यांनी सांगितलं CID मालिका बंद होण्याचं कारण
16
रायबरेलीमध्ये मोठी दुर्घटना टळली; रुळावर मातीचा ढीग, लोको पायलटने ट्रेन थांबवली अन्...
17
लाखो लोक, ट्रॅफिक जॅम, रेल्वे स्टेशन फुल पॅक आणि...; मरिना बीचवरचे धडकी भरवणारे फोटो
18
Ratan Tata Hospitalised: रतन टाटा यांची तब्येत बिघडली, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
19
बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेनंतर जिनिलिया देशमुखची पोस्ट, म्हणाली, "पुढच्या पर्वासाठी..."
20
Prajakta Mali : "तुझ्यातला प्रामाणिकपणा, जिद्द..."; प्राजक्ता माळीने केलं सूरज चव्हाणचं झापुक झुपूक अभिनंदन

Sangli: तासगावात भरवस्तीत फटाक्यांचा स्फोट; प्रशासनाच्या तत्परतेमुळे जीवितहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2023 12:19 PM

रात्री उशिरापर्यंत सहा अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या माध्यमातून आग आटाेक्यात आणण्याचे काम सुरू होते

तासगाव : तासगाव शहरात सोमवार पेठेत सोमवारचा आठवडा बाजार भरलेला असतानाच, नागरिकांचा गजबजाट असलेल्या सोमवार पेठेतच फटाक्यांचा साठा करून ठेवलेल्या दुमजली इमारतीस भीषण आग लागली. आगीत ही इमारत जळून खाक झाली. फटाक्यांचा स्फोट आणि आगीच्या ज्वाळांनी तासगावकर धास्तावले होते. प्रशासनाच्या तत्परतेमुळे जीवितहानी टाळली असून रात्री उशिरापर्यंत सहा अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या माध्यमातून आग आटाेक्यात आणण्याचे काम सुरू होते. घटनास्थळावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.तासगावातील सोमवार पेठेत कोकणे नामक व्यक्तीचे फटाके विक्रीचे दुकान आहे. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या दुमजली घरातच फटाक्यांचा साठा ठेवण्यात आला होता. सोमवारी आठवडा बाजाराचा दिवस होता. फटाक्यांचा साठा करून ठेवलेल्या परिसरातच आठवडा बाजारदेखील भरतो.नागरी वस्तीने गजबजलेल्या या परिसरातच सोमवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास फटाक्यांच्या साठ्याला आग लागली. त्यानंतर फटाक्यांचे स्फाेट सुरू झाले. आगीत कोकणे यांची दुमजली इमारत भस्मसात झाली. फटाक्यांचे स्फाेट आणि आगीच्या उंचच उंच ज्वाळांचे लोट यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले. आगीची माहिती मिळताच तासगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.तहसीलदार रवींद्र रांजणे, पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सांगली महापालिका विटा नगरपरिषद तसेच चितळे दूध डेअरी अशा सहा अग्निशमन पथकांना पाचारण करण्यात आले. सहा गाड्यांच्या माध्यमातून आग आटाेक्यात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू हाेते.अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय अडचणीत असलेल्या ठिकाणातून मार्ग काढत जीव धोक्यात घालून आग आटाेक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालविले हाेते. मात्र, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग तत्काळ आटोक्यात आली.भर वस्तीत फटाक्यांचा स्फोट झाल्यामुळे तासगावकरांचा जीव टांगणीला लागला होता. नागरिकांत घबराटीचे वातावरण दिसून येत होते.

आग लागलेला परिसर रिकामाफटाक्यांनी आग लागलेला परिसर पोलिस आणि पालिका प्रशासनाकडून तत्काळ रिकामा करण्यात आला. आग लागलेल्या इमारतीसह अन्य सर्व इमारतीतील नागरिकांना तातडीने घटनास्थळापासून दूर हलविण्यात आले. त्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. फटाक्यांचा स्फोट झाल्याची बातमी तासगाव शहरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे घटनास्थळी माेठी गर्दी झाली हाेती.

टॅग्स :Sangliसांगलीfireआग