शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

कार्वेत व्यापाऱ्यावरच गोळीबार

By admin | Published: October 13, 2015 10:58 PM

‘बदले की आग’ : तीन गोळ्या झाडल्या, एक जखमी

ऐतवडे बुद्रुक : कार्वे (ता. वाळवा) येथे व्यापाऱ्याने व्यापाऱ्यावर गोळीबार केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली. यात पंडित शामराव पाणिरे यांच्या डाव्या हाताला गोळी लागली आहे. आपल्या सुनेने आत्महत्या केली असून, त्याचा बदला घेण्यासाठीच तिचे वडील सर्जेराव लक्ष्मण शिंदे (रा. भवानीगर, विटा) व त्यांच्या पाच साथीदारांनी गोळीबार केल्याची फिर्याद पाणिरे यांनी कुरळप पोलिसांत दिली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.पंडित पाणिरे नेहमीप्रमाणे घराबाहेरील कट्ट्यावर झोपले होते. मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या दरम्यान तोंडाला कापड बांधलेल्या सहा लोकांनी काही अंतरावरून झोपलेल्या पाणिरे यांच्या दिशेने बंदुकीच्या तीन गोळ्या झाडल्या, परंतु हल्लेखोरांचा नेम चुकला. एक गोळी पाणिरे यांच्या डाव्या हाताला लागली. दचकून जागे झालेल्या पाणिरे यांनी पळत जाऊन शेजारच्या घरात आश्रय घेतला. गोळीबार व आवाजामुळे आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यामुळे हल्लेखोरांनी दुचाकीवरून पलायन केले. त्यानंतर परिसरातील लोकांनी कुरळप पोलिसांना घटनेची माहिती दिली. कुरळप पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन जखमी पाणिरे यांना इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पाणिरे यांनी स्वत: फिर्याद दिली असून त्यामध्ये म्हटले आहे की, आपली सून उज्ज्वला हिने दोन वर्षांपूर्वी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येस मीच कारणीभूत असल्याचा राग तिचे वडील सर्जेराव लक्ष्मण शिंदे यांच्या मनात आहे. या रागातूनच त्यांनी पाच साथीदारांसह माझ्यावर गोळीबार केला.दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली शिंदे व गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी पोलिसांनी श्वानपथक आणले होते. ते काही अंतरावर जाऊन घुटमळले. संशयितांना ताब्यात घेण्यासाठी कुरळप पोलिसांचे पथक रवाना झाले असून, सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांबळे पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)