सांगली - सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठल्यानंतर आणि राज्यातील पहिल्यांदाच होत असलेल्या आणि पाहिलाच मान मिळालेल्या नांगोळे (ता.कवठेमहांकाळ) येथील बैलगाडा शर्यतीत कोल्हापूरच्या संदीप पाटील यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांकाचे 1 लाखाचे बक्षिस पटकावले. प्रथम क्रमांकाच बक्षीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिले. बैलगाडी शर्यती पोलीस व महसूल प्रशासनाने दिलेल्या नियमानुसार पार पडल्या.
शिवसेनेचे संदीप आबा गिड्डे पाटील यांच्या वाढदिवसाचे निमित्त होते. नांगोळे येथील शिवसेनेचे संदीप गिड्डे पाटील यांनी वाढदिवसानिमित्त राज्यातील पहिलेच बैलगाडा शर्यतीचे मैदान २५ डिसेंबर रोजी आयोजित केले होती. मात्र,तांत्रिक कारणामुळे ही शर्यत ०४ जानेवारी रोजी झाल्या. शर्यतीस सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी नियम व अटी घालून परवानगी दिली होती
निकाल खालीलप्रमाणे - अ गट जनरल प्रथम संदीप पाटील (कोल्हापूर), द्वितीय अवि माने (डफळापुर), तृतीय बाळू नाईक (कलोती), ब पहिला गट प्रथम सतीश उपाध्ये (बेंद्री) द्वितीय बाळू खामकर (अलकुड (एस),तृतीय अक्षय भोसले (काननवाडी), ब दुसरा गट प्रथम बाळू डोंगरे (मिरज),राजू पाटील (कोंगनोळी) तृतीय ज्ञानू देवकाते (खलाटी)आणि आदत गटात प्रथम सचिन सरवदे (जाखापुर), द्वितीय श्रीकांत हजारे (कुकटोळी), तृतीय संतोष गलांडे (अंकले) यांनी बक्षीस पटकावले.
दरम्यान, शर्यतीसाठी शिवसेनेचे संजय विभुते,शंभूराजे काटकर,संदीप गिड्डे- पाटील,दादासाहेब कोळेकर,संजय हजारे,विकास हाक्के,भगवान वाघमारे,मारुती पवार यांच्यासह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. शर्यती शौकिनांची उपस्थिती होती.