सांगली : महापालिका निवडणुकीसाठी पहिल्यांदाच भाजपकडे इच्छुकांची मोठी गर्दी होती. यापूर्वी भाजपची उमेदवारी कार्यकर्त्यांच्या गळ्यात मारली जात होती; पण यंदा मात्र इच्छुकांची संख्या वाढल्याने रविवारी जोरदार शक्तिप्रदर्शनात मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला. मोटारसायकल रॅली, पदयात्रा, घोषणाबाजीने भाजपचे नेतेही सुखावले होते. दिवसभरात शंभरहून अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या.महापालिका निवडणुकीसाठी भाजप इच्छुकांच्या मुलाखती येथील कच्छी जैन भवनमध्ये झाल्या. पक्ष निरीक्षक रवी अनासपुरे, सांगलीचे प्रभारी अतुल भोसले, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, नीता केळकर उपस्थित होत्या.सकाळी दहा वाजल्यापासून इच्छुक उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत मुलाखती दिल्या. पक्षाचे झेंडे, गळ्यात मफलर, टोप्या घालून इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन केले. उमेदवारांनी प्रभागातील आपल्या कामाचा, संपर्काचा आढावा नेत्यांसमोर मांडून आपल्यालाच उमेदवारी देण्यासाठी आग्रही मागणी केली. त्यांचे समर्थकही आपल्या उमेदवाराची बाजू मांडत होते. इच्छुकांनी गेल्या चार वर्षात पक्षासाठी केलेल्या कष्टाचा पाढाच वाचला. भाजपसाठी प्रसंगी काठ्या खाल्ल्याची आठवणही नेत्यांना करून दिली. लोकसभा, विधानसभा निवडणुकीला राबल्याचा दाखला देत यंदा उमेदवारी आपल्यालाच हवी, असे साकडेही घातले.काहींनी तर भाजपसोबत हिंदुत्ववादी संघटनेत बऱ्याच वर्षापासून काम करण्याचे सांगत, या निवडणुकीत नव्या चेहºयांना संधी देण्याची मागणी केली. एकाच प्रभागातील काही इच्छुक स्वतंत्रपणे, तर काहींनी एकत्रित मुलाखती दिल्या. काहींनी उमेदवारी मिळाली नाही तरी पक्षाचे काम करण्याची ग्वाहीही दिली.जनतेचा कौल आमच्या बाजूनेच : संजयकाका पाटीलमहापालिकेतील सत्ताधाºयांना गेल्या पाच वर्षात शहराचा विकास करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला असून, जनतेचा कौल भाजपच्याच बाजूने असल्याचा दावा खा. संजयकाका पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. महापालिकेत भाजपची सत्ता येणार आहे. पक्षाच्यावतीने केलेल्या सर्व्हेतही चांगल्या जागा मिळण्याचा अंदाज आहे. नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात कोट्यवधीचा निधी आला आहे. अमृत योजना मंजूर केली आहे. नगरोत्थानमधून निधी मिळाला आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही, याची जाणीव जनतेला झाली आहे. उमेदवारी मिळावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. उमेदवारीसाठी भाजपमध्ये स्पर्धा राहील, पण इच्छुकांत संघर्ष होणार नाही, असेही पाटील म्हणाले.प्रमुख इच्छुक असेनगरसेवक युवराज बावडेकर, धीरज सूर्यवंशी, विक्रम सावर्डेकर, रणजित सावर्डेकर, अजिंक्य पाटील, सुब्राव मद्रासी, भारती दिगडे, हणमंत पवार, पापा बागवान, विजय हाबळे, शरद नलावडे, कौस्तुभ कुलकर्णी, लक्ष्मण नवलाई, दरिबा बंडगर, मुन्ना कुरणे, शशिकांत फल्ले, अशोक शेट्टी.
भाजपच्या मुलाखतींचा सांगलीत पहिल्यांदाच धुरळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 11:19 PM