शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

देशभरात सर्वत्र फॅसिझमला पहिल्यांदा विरोध चित्रकारांचाच-- मंगेश काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 11:55 PM

सांगली : देशात फॅसिझमचा प्रभाव वाढत चालला आहे. त्याविरोधात बुद्धिजीवी वर्गाने व्यक्त होण्याची गरज आहे.

ठळक मुद्देशांतिनिकेतनमध्ये कलासंवाद व प्रात्यक्षिकसांगलीतील कलाविश्व महाविद्यालयात विरुपीकरण चित्राचे प्रात्यक्षिक कलाभ्यासक दाखविले.तरीही भारत हा चित्रकलेचा देश म्हणून ओळखला जात नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : देशात फॅसिझमचा प्रभाव वाढत चालला आहे. त्याविरोधात बुद्धिजीवी वर्गाने व्यक्त होण्याची गरज आहे. फॅसिझमवाद कोणत्या पक्षाशी निगडित नसून समाजाच्या सर्व क्षेत्रांवर त्याचा परिणाम होतो. फॅसिझमला सर्वात आधी चित्रकारांनीच विरोध केला होता, असे प्रतिपादन कलाभ्यासक मंगेश काळे यांनी शुक्रवारी केले.

सांगलीतील शांतिनिकेतन कलाविश्व महाविद्यालयात आयोजित ‘विरुपीकरण, कलासंवाद, कला प्रात्यक्षिक व चित्रप्रदर्शन’ या उपक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रा. गौतमीपुत्र कांबळे, प्रा. सुरेश पंडित यांच्यासह कलामहाविद्यालयातील आजी-माजी प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्य बाळासाहेब पाटील यांनी स्वागत केले.

काळे म्हणाले की, मोगल काळात चित्रकलेला आश्रय मिळाला होता. पण तरीही भारत हा चित्रकलेचा देश म्हणून ओळखला जात नाही. चित्रकला ही मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पण त्याकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष आहे. आजही आपण पाश्चात्यांच्या चित्रकलेचे अनुकरण करण्यातच धन्यता मानतो. त्यासाठी देशात चित्रकलेला पोषक वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. पाश्चात्य चित्रकार पिकासो आणि फ्रान्सीस बेकन यांनी विरुपीकरणाचा प्रवाह सुरु केला.

प्रचलित चित्रकलेतील अ‍ॅनाटॉमीसह दृष्यात्मकतेची सर्व बंधने झुगारून विरुपीकरण होत असते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन भारतातील तय्यब मेहता, एफ. एन. सुझा, एम. एफ. हुसेन, रझा, आरा अशा मंडळींनी विरुपीकरणातील नवे भारतीय प्रवाह प्रस्थापित केले. जोगेन चौधरी, बिकाश भट्टाचार्य, सुनील दास, भूपेन खक्कर, भारती खेर, सुरेंद्र नायर, मंजुनाथ कामत, जगन्नाथ पांड्या अशा अनेक चित्रकारांनी ही वाट अधिक प्रशस्त केली. बडोदा, बंगाल, बॉम्बे स्कूलसारख्या चळवळींमधून हा प्रवाह अधिक घट्ट झाला. माणसाच्या अंतर्मनाच्या पातळीवरील भाव-भावनांचे प्रतिबिंब बºयाचदा विरुपीकरणाच्या माध्यमातून प्रगट होते, असेही काळे म्हणाले.