शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
4
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
5
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
6
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
7
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
8
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
9
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
10
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
11
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
12
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
13
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
14
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
15
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
16
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
17
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
18
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
19
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
20
Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?

सांगलीत साडेपाच लाख वाहनांना बसवावी लागणार नवी नंबरप्लेट, किती वाहनांची झाली ऑनलाइन नोंदणी.. वाचा

By संतोष भिसे | Updated: March 4, 2025 15:08 IST

सांगली : वाहनांच्या नंबरप्लेटमधील छेडछाड आणि बनवेगिरीचे गुन्हे कमी करण्यासाठी सर्व वाहनांना एचएसआरपी नंंबरप्लेट बसविणे सक्तीचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ...

सांगली : वाहनांच्या नंबरप्लेटमधील छेडछाड आणि बनवेगिरीचे गुन्हे कमी करण्यासाठी सर्व वाहनांना एचएसआरपी नंंबरप्लेट बसविणे सक्तीचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १० हजार ४२१ वाहनधारकांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली आहे. त्यापैकी १ हजार ७२१ वाहनधारकांच्या वाहनांना नवीन नंबरप्लेट बसविल्या आहेत. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी ही माहिती पत्रकार बैठकीत दिली.गाजरे म्हणाले, १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसविणे बंधनकारक आहे. यासाठी शासनाच्या संकेतस्थळावरुन नोंदणी करता येते. यासाठी वाहनमालकांनी कोणालाही अतिरिक्त शुल्क देऊ नये. नंबरप्लेट बसविण्यासाठी जिल्ह्यातील सात ठिकाणी स्वतंत्र केंद्रे सुरु केली आहेत. अंकली, मिरज, सांगली, विटा, इस्लामपूर येथे ही केंद्रे कार्यान्वित आहेत.ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुटसुटीत आहे. अर्ज भरल्यावर वाहनप्रणालीशी वाहनाची माहिती संलग्न केली जाते. यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे सुलभ होणार आहे. जिल्ह्यात सध्या रस्त्यावर १४ लाख १२ हजार वाहने धावत आहेत. त्यापैकी १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांची संख्या ५ लाख ५९ हजार २९७ आहे. १५ वर्षांपेक्षा जुने वाहन असलेल्या व पुनर्नोंदणी केलेल्या वाहनांनाही एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे आवश्यक आहे. आतापर्यंत २ टक्के वाहनधारकांनी नव्या नंबरप्लेटसाठी नोंदणी केली आहे. नंबरप्लेट बसविण्यासाठी ३० एप्रिलपर्यत मुदतवाढ दिली आहे.

वाहनमालकांची गैरसोयएचएसआरपी नंबरप्लेटसाठी जिल्ह्यात सात केंद्रांची सुविधा केली आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यावर अपॉइंटमेंट मिळते. दिवस आणि वेळ निवडण्याचे स्वातंत्र्य वाहनमालकाला आहे. पण अनेक केंद्रांवर रणरणत्या उन्हात वाहनचालक प्रतीक्षेत थांबल्याचे चित्र दिसत आहे. दिलेली वेळही केंद्रचालक पाळत नसल्याची तक्रार आहे.

दृष्टीक्षेपात आढावा

  • जिल्ह्यातील एकूण वाहनसंख्या : १४ लाख १२०००
  • १ एप्रिल २०१९ पूर्वीची वाहनसंख्या : ५ लाख ५९ हजार २९७
  • आतापर्यंत ऑनलाइन नोंदणी : १०४२१
  • आतापर्यंत नवी नंबरप्लेट बसविलेली वाहने : १७२१
  • नवी नंबरप्लेट बसविण्यासाठी मुदत ३० एप्रिल २०२५
टॅग्स :SangliसांगलीRto officeआरटीओ ऑफीस