शहरं
Join us  
Trending Stories
1
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : योगायोग! उद्या निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण होणार
3
विधानसभेच्या या मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवार बाजी मारणार, सत्तास्थापनेत किंगमेकरही ठरणार?
4
दिंडोरीत पुन्हा घड्याळाची टिकटिक, की वाजणार तुतारी?
5
IND vs AUS : KL राहुलच्या विकेटसह पडली वादाची ठिणगी; खरंच चिटिंग झाली? (VIDEO)
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
7
Video - नवरा-नवरीला गिफ्ट द्यायला आला अन् खाली कोसळला; स्टेजवरच हार्ट अटॅकने मृत्यू
8
ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिना खानचं टीव्हीवर कमबॅक, Bigg Boss 18 मध्ये दिसणार
9
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
10
मुंबईत मतमोजणीची तयारी पूर्ण; २,७०० हून अधिक कर्मचारी, १० हजार पोलीस तैनात
11
करमाळ्यात कुर्डूवाडीसह ३६ गावे ठरणार गेमचेंजर; 'हा' फॅक्टर निर्णायक राहणार!
12
Adani Group Stocks: आरोपांनंतर अदानी समूहाचे शेअर्स आजही गडगडले; 'या' कंपनीला सर्वाधिक फटका
13
अभिनयक्षेत्रातून निवृत्ती घेणार का? अनिल कपूरला नाना पाटेकर म्हणाले- "माझ्याकडे काम नसेल तर..."
14
कोहलीचा 'विराट' संघर्ष कायम! हेजलवूडच्या अतिरिक्त उसळी घेणाऱ्या चेंडूवर 'किंग'ची झाली 'शेळी'
15
तेराव्या वर्षी सेल्समन म्हणून काम, आईकडून १० हजार घेऊन सुरू केला व्यवसाय, उभारला ३३ हजार कोटींचा ब्रँड
16
सामान्यांना महागाईचा चटका! गॅस कंपनीकडून वाईट बातमी; CNG च्या दरात इतक्या रुपयांची भाववाढ
17
Baba Siddiqui : फोन इंटरनेटचा वापर न करता कसा रचला कट?; बाबा सिद्दिकी हत्येतील आरोपीचं रहस्य उघड
18
'महागाईविरुद्धची लढाई अजून संपलेली नाही' डिसेंबरमध्ये EMI घटणार? RBI ने दिले संकेत
19
"सीआरपीएफचे जवान नसते तर...", मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी जिरीबाममधील हल्ल्याची दिली माहिती
20
"आलियाला कपडे बदलायचे होते अन् क्रू मेंबर..." इम्तियाज अलीचा धक्कादायक खुलासा

सांगली जिल्ह्यात तिशीच्या आतील साडेपाच लाख मतदार ठरणार निर्णायक; सर्वाधिक अन् सर्वात कमी मतदार कुठं.. वाचा

By अशोक डोंबाळे | Published: November 08, 2024 6:10 PM

सांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत महाविकास आघाडी व महायुतीकडून तुल्यबळ लढतीचे उमेदवार देण्यात आले आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक ...

सांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत महाविकास आघाडी व महायुतीकडून तुल्यबळ लढतीचे उमेदवार देण्यात आले आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक काट्याच्या लढती होण्याचे चित्र आहे. यामध्ये एकूण २५ लाख ३६ हजार ६५ मतदार आहेत. यापैकी ३० वर्षांआतील ५ लाख ४३ हजार ५४७ मतदार आहेत. या तरुणांचाच कौल निर्णायक ठरणारा आहे. खानापूर मतदारसंघात सर्वाधिक ७७ हजार ३६ आणि सर्वात कमी ५८ हजार ७५९ इस्लामपूरमध्ये युवा मतदार आहेत.पदवीचे शिक्षण घेऊन तरुण रोजगाराच्या शोधात फिरत आहे. शासकीय नोकऱ्या मिळणे कठीण झाले आहे. स्पर्धा जीवघेणी ठरत आहे. सरकारी भरतीतील दहा जागांसाठी लाखोंवर उमेदवारांचे अर्ज येतात. साधा शिपाई बनण्यासाठी उच्चशिक्षित तरुण तयार होतो. बेरोजगारीचा बकासूर अनेकांचे भविष्य अंधकारमय करीत आहे. हाताला रोजगार नसल्याने विवाहाचे वयही वाढत चालले आहे.दुसरीकडे शेती या परंपरागत व्यवसायात आता नफा मिळणे बंद झाला आहे. त्यामुळे रोजगारासाठी घराबाहेर पडण्याशिवाय स्थानिक युवकांपुढे पर्याय नाही. सध्याच्या तरुणांपुढे रोजगार हाच एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत येत्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना उत्तरे द्यावी लागणार आहेत. बेरोजगारी कमी करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या योजना अतिशय तुटपुंज्या आहेत. राजकीयदृष्ट्या जागरूक असणारा युवा वर्ग या निवडणुकीत निर्णायक मतदान ठरणार आहे.

प्रचाराच्या मुद्यात तरुणांना हवे स्थान

  • राजकीय पक्षासोबतच स्थानिक उमेदवारांना सुद्धा मतदारसंघातील युवा मतदारांना आकर्षित करता येईल असे मुद्दे प्रचारात घ्यावे लागणार आहेत. युवकांच्या समस्या आणि त्यावरील उपाय प्रभावीपणे या प्रचाराच्या रणधुमाळीत मांडावे लागणार आहेत. तरच हा युवा मतदार मतांचे दान देण्याची तयारी दाखवणार आहे.
  • आठ विधानसभेत १८ ते १९ या वयोगटातील ५६ हजार ६५० मतदार आहेत. तर २० ते २९ या वयोगटातील ४ लाख ८६ हजार ८९७ मतदार आहेत.

तिशीच्या आतील मतदारमतदारसंघ - मतदार संख्या

  • मिरज- ७१०३५
  • सांगली- ७१३७१
  • इस्लामपूर- ५८७५९
  • शिराळा- ६२९११
  • पलूस-कडेगाव- ६५६५९
  • खानापूर- ७७०३६
  • तासगाव-क.महांकाळ- ६७४६८
  • जत- ६९३०८
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024