सांगली : सांगली लोकसभेसाठी २५ उमेदवारापैकी आज, सोमवारी पाच उमेदवाराने अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे सद्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात २० उमेदवार रिंगणात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या मैदानातून दिगंबर जाधव, बापू सुर्यवंशी, प्रतिक पाटील, सुरेश टेंगले, रेणुका शेंडगे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. भाजपचे संजय पाटील, महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील, कॉंग्रेस बंडखोर विशाल पाटील, ओबीसी बहुजन आघाडीचे प्रकाश शेंडगे अशी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.विशाल पाटील यांची माघार नाहीच, महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढलीकाँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी माघार घेणार नाही हे स्पष्ट केल्यामुळे सांगली लोकसभा निवडणूक तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.विशाल पाटील यांनी कार्यकर्ते आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप यांच्याशी चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये, अशी सूचना घोरपडे, जगताप यांनी विशाल पाटील यांना दिली आहे. त्यानुसार विशाल पाटील यांनी काँग्रेस पक्षाने काही कारवाई केली तरी उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली.
सांगली लोकसभेसाठी २० उमेदवार रिंगणात, विशाल पाटील यांचे बंड कायम; पाचजणांची माघार
By अशोक डोंबाळे | Published: April 22, 2024 5:54 PM