शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

पाच ग्रामसेवकांवर फौजदारी

By admin | Published: January 04, 2017 10:31 PM

जिल्हा परिषद स्थायी समिती सभा : चौतीसजणांची वेतनवाढ रोखली

सांगली : जिल्ह्यातील पंचवीस ते तीस ग्रामपंचायतींमध्ये लाखो रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी पाच ग्रामसेवकांवर फौजदारी करण्यात आली. तसेच उर्वरित ३४ ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखण्याचा निर्णय जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत बुधवारी घेण्यात आला.जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहल पाटील यांच्या अध्यक्षेतखाली स्थायी समितीची सभा झाली. यावेळी ग्रामसेवकांच्या अपहाराचा मुद्दा सदस्य रणधीर नाईक यांनी उपस्थित केला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी, ए. एन. कांबळे (मासाळवाडी, ता. आटपाडी), एल. जी. खांडेकर (काराजनगी, ता. जत), बी. बी. साठे (फुपिरे, ता. शिराळा), पी. एन. कोळी (राडेवाडी, ता. पलूस), ए. एस. मुलाणी (शेखरवाडी, ता. वाळवा) या ग्रामसेवकांवर फौजदारी कारवाई केली आहे, तसेच आणखी चार ग्रामसेवकांवर कायदेशीर सल्ला घेऊन दोन दिवसात फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, याशिवाय ३४ ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.यावेळी रणधीर नाईक यांनी, फौजदारी कारवाईबरोबरच संबंधित ग्रामसेवकांकडून अपहाराची रक्कम वसूल झाली पाहिजे, अशी भूमिका घेतली. त्यादृष्टीनेही प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजेत, अशीही त्यांनी मागणी केली. त्यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ यांनी, संबंधित ग्रामसेवकांकडून अपहाराची रक्कम वसुलीच्यादृष्टीनेच फौजदारी कारवाई केली आहे, काही ग्रामपंचायतींमधील अपहाराची रक्कम संबंधित ग्रामसेवकांकडून वसूल केली आहे. तरीही अपहारास जबाबदार धरून त्यांच्यावर वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली आहे, असेही सांगितले.जिल्ह्यातील उर्वरित ग्रामपंचायतींचेही लेखापरीक्षण करण्याची मागणी सदस्यांनी स्थायी समितीत केली. (प्रतिनिधी)योजनांचे पैसे : आता लाभार्थींच्या खात्यावरजिल्हा परिषद स्वीय निधीतून कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, समाजकल्याण विभागाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. साहित्य खरेदीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी योजनांचा निधी थेट लाभार्थींच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय स्थायी समितीत घेण्यात आला. त्यानुसार लेडीज सायकलसाठी प्रति लाभार्थी ३७०० रूपये, झेरॉक्स यंत्रासाठी ३० हजार, शिलाई यंत्रासाठी सहा हजार, चापकटर ११ हजार ५०० आणि स्पे्रपंपासाठी २७०० रूपये देण्याचा निर्णयही झाला. येत्या दोन दिवसात ही रक्कम लाभार्थींच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती स्नेहल पाटील यांनी सांगितली.