पिराप्पा मलमे व सोलापूर येथून आलेले काही चंदन व्यावसायिक यांच्यात चंदनाच्या देण्या-घेण्यावरून वाद सुरू झाला होता. त्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मलमे यांच्या घरात पाच किलो तयार चंदन सापडले. पोलिसांनी तयार चंदन जप्त करून मलमे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी सोलापूर जिल्ह्यातील चार चंदन तस्कर, एक चारचाकी गाडी व एक दुचाकी होती. पोलिसांनी त्यांच्याविरोधात कोणतीच कारवाई केली नाही, याची येथे उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
वादामुळे प्रकरण उघडकीस
पिराप्पा मलमे व सोलापूर जिल्ह्यातील काही चंदन तस्करांची ‘लिंक’ आहे. आर्थिक देवाण-घेवाण व इतर कारणांवरून त्यांच्यात मंगळवारी वाद सुरू होता. त्यांच्यात समेट झाला नाही. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले असल्याचे समजते.