शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

महामार्गावर दोन अपघांतात पाच ठार; चौघेजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2016 1:21 AM

मृत सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील : नेर्लेजवळ कंटेनरच्या धडकेने दुचाकीवरील तिघांचा मृत्यू; येडेनिपाणीजवळ मोटार उड्डाणपुलावरून कोसळून गांधीनगरचे सासरा-सून ठार

कासेगाव/कामेरी : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत पाचजण ठार झाले, तर चारजण गंभीर जखमी झाले. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नेर्ले (ता. वाळवा) गावाजवळ कंटेनरने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील तिघे ठार झाले. हा अपघात मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास घडला. विठ्ठल कुमार मंडले (वय ३०), अमर ऊर्फ बापू शामराव कांबळे (२७, दोघे रा. रेठरे कारखाना, ता. कऱ्हाड, जि. सातारा) व भगीरथ महादेव कुंभार (२३, रा. खुबी, ता. कऱ्हाड) अशी मृतांची नावे आहेत. विठ्ठल मंडले, अमर कांबळे व भगीरथ कुंभार हे मित्र असून, काही कामानिमित्त मंगळवारी इस्लामपूरला आले होते. तेथील काम आटोपून पुन्हा कऱ्हाडकडे निघाले होते. ते ज्या दुचाकीवरून प्रवास करीत होते, ती नवीन असून, अद्याप पासिंगही झालेले नाही. त्यामुळे दुचाकीला क्रमांक नव्हता. त्यांची दुचाकी नेर्ले येथील हॉटेल दत्त भुवनजवळ आली असताना कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेल्या कंटेनरने (आरजे १४ जीजी ७०७९) पाठीमागील बाजूने दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकी कंटेनरच्या चाकात अडकली गेली. यामध्ये डोक्याला गंभीर मार लागल्याने मंडले व कांबळे जागीच ठार झाले, तर कुंभार गंभीर जखमी झाला होता. अपघाताचे वृत्त समजताच हॉटेल दत्त भुवनमधील सर्व घटनास्थळी धावले. त्यांनी तत्काळ जखमीला कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले; परंतु तेथे उपचार सुरू असताना कुंभार याचाही मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनरचालक वाहन तेथेच सोडून पसार झाला. अर्जुन लक्ष्मण सूर्यवंशी (रा. काळमवाडी) यांनी कासेगाव पोलिसांत या घटनेची वर्दी दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत. दुसरा अपघात बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील येडेनिपाणी-इटकरे फाट्याजवळ उड्डाणपुलावरून २५ ते ३० फूट खाली मोटार कोसळून झाला. यात सासरा-सून जागीच ठार, तर चौघे गंभीर जखमी झाले. रामचंद्र गुरुनोमल वधवा (वय ६५), भावना मनोज वधवा (३५, सर्व रा. गांधीनगर, कोल्हापूर) यांचा मृतांमध्ये समावेश आहे, तर मनोज रामचंद्र वधवा (३५), मोहित मनोज वधवा (९), महेक मनोज वधवा (१३), अश्विनी वधवा (१५, सर्व रा. गांधीनगर, कोल्हापूर) गंभीर (पान १ वरून) जखमी आहेत. गांधीनगर येथील वधवा कुटुंबीय बुधवारी (दि. १ जून) पहाटे मोटारीतून (एमएच 0८ आर ५६७८) उरळीकांचन येथे देवदर्शनासाठी निघाले होते. मनोज वधवा स्वत: गाडी चालवीत होते. त्यांच्यासोबत वडील रामचंद्र वधवा, पत्नी भावना वधवा, मुले महेक आणि मोहित व भाची अश्विनी हेही देवदर्शनासाठी निघाले होते. वधवा यांची मोटार इटकरे-येडेनिपाणी फाट्यानजीकच्या उड्डाणपुलाजवळ आली असता त्यांच्या गाडीच्या आडवे कुत्रे गेले. त्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात मनोज वधवा यांचा मोटारीवरील ताबा सुटला. यामुळे मोटार उड्डाणपुलावरून २५ ते ३0 फूट खाली असलेल्या सेवारस्त्यावर कोसळली. यामध्ये रामचंद्र वधवा, भावना वधवा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन अतिरक्तस्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. इतर चौघे गंभीर जखमी झाले. यामध्ये मोटारीचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. अपघातानंतर स्थानिक रहिवाशांनी जखमींना तत्काळ बाहेर काढून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची नोंद कुरळप पोलिस ठाण्यात झाली असून, सहायक पोलिस निरीक्षक पल्लवी चव्हाण अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर) (पान ९ वर) कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात अपघात वधवा यांची मोटार इटकरे-येडेनिपाणी फाट्यानजीकच्या उड्डाणपुलाजवळ आली असता त्यांच्या गाडीच्या आडवे कुत्रे गेले. त्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात मनोज वधवा यांचा मोटारीवरील ताबा सुटला. यामुळे मोटार उड्डाणपुलावरून २५ ते ३0 फूट खाली असलेल्या सेवारस्त्यावर कोसळली. यामध्ये रामचंद्र वधवा, भावना वधवा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन अतिरक्तस्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. इतर चौघे गंभीर जखमी झाले. यामध्ये मोटारीचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.