निलेश थोरात व डॉ. विश्वजीत थोरात यांचा आरगेत वाडा आहे. गुरुवारी दुपारी थोरात यांची आई व डॉ. विश्वजीत थोरात यांचा मुलगा घरात हॉलमध्ये व घरातील इतर सदस्य दुसऱ्या मजल्यावर झोपले होते. अज्ञात चोरट्याने थोरात यांच्या घरात प्रवेश केला. चोरट्याने एका खोलीतील कपाट उघडून त्यातील ५ लाख रुपये किमतीचे दीड तोळ्याचे नेकलेस, अडीच तोळ्याचे लक्ष्मी हार व एक तोळ्याचे गंठण असे सुमारे नऊ तोळ्याचे दागिने घेऊन पोबारा केला.
दुपारी पाच वाजता डॉ. विश्वजीत थोरात यांच्या पत्नी खोलीत गेल्यानंतर कपाट उघडे असल्याचे दिसले. कपाटातील साहित्य विस्कटून त्यातील दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. भरदुपारी झालेल्या घरफोडीमुळे गावात खळबळ उडाली होती. याबाबत निलेश थोरात यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.