शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

सांगलीत पाच पिस्तूल, दहा काडतुसे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 11:31 PM

सांगली : शहरात पिस्तूल व काडतुसांची विक्री करण्यास आलेल्या सातारा व पुणे जिल्ह्यातील दोघांना गुंडाविरोधी पथकाने रविवारी दुपारी पकडले. शंभरफुटी रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ ही कारवाई करण्यात आली. दोघांकडून पाच पिस्तूल, दहा जिवंत काडतुसे, दोन मोबाईल व दुचाकी असा साडेतीन लाखांचा माल जप्त केला आहे.सौरभ विजय कुलकर्णी (वय २१, रा. ...

सांगली : शहरात पिस्तूल व काडतुसांची विक्री करण्यास आलेल्या सातारा व पुणे जिल्ह्यातील दोघांना गुंडाविरोधी पथकाने रविवारी दुपारी पकडले. शंभरफुटी रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ ही कारवाई करण्यात आली. दोघांकडून पाच पिस्तूल, दहा जिवंत काडतुसे, दोन मोबाईल व दुचाकी असा साडेतीन लाखांचा माल जप्त केला आहे.सौरभ विजय कुलकर्णी (वय २१, रा. गुरसाळे, ता. खटाव, जि. सातारा) व सौरभ सुनील जाधव (२२, बस स्थानकाजवळ, भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे, सध्या गुरसाळे, जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा व अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी बेकायदा हत्यार बाळगणारे व रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक संजय डोके रविवारी शंभरफुटी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी डोके यांना दोन तरुण काळ्या रंगाच्या दुचाकीवरून चेतना पेट्रोल पंपाजवळ पिस्तूल व काडतुसाची विक्री करण्यास येणार असल्याची माहिती मिळाली.पथकाने पंपाजवळ सापळा लावला. त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार, दोन तरुण काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन आले. त्यांना थांबवून चौकशी केली असता, एकाच्या पाठीवर सॅक होती. सॅकची झडती घेतल्यानंतर त्यात पाच पिस्तूल व दहा जिवंत काडतुसे सापडल्याने ती जप्त करण्यात आली. दोघांची कसून चौकशी करण्यात आली. यामध्ये त्यांनी हा शस्त्रसाठा विक्री करण्यास आलो होतो, अशी कबुली दिली आहे. त्यांच्याविरुद्ध बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी विश्राबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना सोमवारी न्यायालयात उभे केले जाणार आहे. सहाय्यक पोलीस फौजदार लक्ष्मण मोरे, महेश आवळे, शंकर पाटील, सागर लवटे, संदीप गुरव, आर्यन देशिंगकर, सुप्रिया साळुंखे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.पहिल्यांदाच रेकॉर्डवरशर्मा म्हणाले, संशयित पहिल्यांदाच रेकॉर्डवर आले आहेत. यातील सौरभ कुलकर्णी हॉटेल व्यावसायिक आहे. त्याचा साथीदार इंदापूर तालुक्यातील असला तरी तो नोकरीनिमित्त गुरसाळेत राहतो. त्यामुळे या दोघांची ओळख आहे. एवढी पिस्तुले व काडतुसे त्यांच्याजवळ आढळून आल्याने ते कोणाला तरी विकणार होते, हे स्पष्ट होते. ज्याला या शस्त्रांची गरज होती, त्याच्यापासून कोणाच्या जिवाला धोका असू शकतो, या सर्व बाबी तपासातून उजेडात आणल्या जातील.मुळापर्यंत तपास : शर्माजिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन या कारवाईची माहिती दिली. गुंड भावश्या पाटीलला पकडण्याची कामगिरी करणाऱ्या गुंडाविरोधी पथकाचे शर्मा यांनी पुन्हा एकदा कौतुक केले. ते म्हणाले, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिस्तूल व काडतुसे पकडण्याची झालेली कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. संशयितांची कसून चौकशी केली जाईल. त्यांनी पिस्तूल कोठून आणले? सांगलीत कोणाला विकणार होते? त्यांच्याकडे सापडलेली दुचाकी कोणाची? याच्या मुळापर्यंत जाऊन तपास केला जाईल.