शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

सांगलीत पूरस्थिती, ‘कृष्णे’ची पातळी ३१ फुटांवर; नदीकाठची हजारो एकरांतील पिके पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 13:47 IST

वारणा धरणातूनही विसर्ग वाढविला, ‘अलमट्टी’तून सव्वादोन लाख क्युसेक विसर्ग

सांगली : कोयना, वारणा धरण क्षेत्रासह जिल्ह्यात बुधवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. वारणा ८६ टक्के भरल्यामुळे धरणाचे चार दरवाजे उघडून आठ हजार ८७४ क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. कोयना धरण ६७ टक्के भरले असून, तेथून एक हजार ५० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कृष्णा, वारणा नद्यांची पाणीपातळी वाढत असून, सांगली आर्यविन पूल येथे कृष्णेची पाणीपातळी ३१ फुटांवर गेल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. वारणा नदीकाठची हजारो एकर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेली आहेत.वारणा धरण क्षेत्रातील शिराळा, वाळवा तालुक्यात सलग चौथ्या दिवशी संततधार पाऊस सुरूच आहे. मिरज, तासगाव, पलूस, कडेगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, आटपाडी व जत तालुक्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. पावसाचा जोर वाढल्यामुळे वारणा धरणाचे दोन वक्राकार दरवाजे एक मीटरने, तर दोन दरवाजे ०.७५ मीटरने उघडले आहेत. नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने शिराळ्यातून शाहूवाडी तालुक्याशी संपर्क तुटला आहे. नदीकाठावरील शेकडो एकर पिके, स्मशानभूमी पाण्याखाली गेल्या आहेत.कृष्णा नदीवरील बहे (ता. वाळवा) येथील रामलिंग बेटाला पाण्याचा विळखा पडला असून, बेटावर जाण्यासाठी असलेला मार्ग बंद झाला आहे. कृष्णा नदीची दिवसभरात तीन फुटांनी पाणीपातळी वाढली असून, सांगली आर्यविन येथे ३१ फुटांवर पाणीपातळी गेली आहे. यामुळे सांगली, मिरज शहरांतील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. सांगलीतील सूर्यवंशी प्लॉट येथील काही नाकरिकांना स्थलांतरित करण्यात आले.

कमळापुरात येरळा नदीचा पूल वाहतुकीसाठी बंद, दोन तालुक्यांचा संपर्क तुटलासंततधार पावसाने येरळा नदीला पूर आला आहे. खानापूर व कडेगाव या दोन तालुक्यांना जोडणारा कमळापूर येथील येरळा नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने बुधवारी सकाळी विटा पोलिसांनी हा पूल वाहतुकीसाठी बंद केला. पोलिस प्रशासनाने तातडीने कार्यवाही केल्याने खानापूर व कडेगाव या दोन तालुक्यांचा संपर्क तुटला आहे.

शिराळा तालुक्यात सर्वाधिक ४४.१ मिलिमीटर पाऊसजिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १७.४ मि.मी. पाऊस झाला असून, शिराळा तालुक्यात सर्वाधिक ४४.१ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात २४ तासांत पडलेला पाऊस व कंसात १ जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे : मिरज १४.१ (३६९), जत ४.७ (२६२.५), खानापूर १३.२ (२९८.३), वाळवा २६ (५६२.६), तासगाव १४.६ (३६४.८), शिराळा ४४.१ (७९७.२), आटपाडी १.७ (२३१.४), कवठेमहांकाळ ८.२ (३५३.४), पलूस १६.१ (३८७.२), कडेगाव २१.७ (३८२.२).

कृष्णा नदीची पाणीपातळी

  • पाणीपातळी (फूट- इंचामध्ये)
  • कराडचा कृष्णा पूल १८.५
  • बहे पूल १०.०३
  • ताकारी पूल ३१.०९
  • भिलवडी पूल ३२.०२
  • सांगली आर्यविन पूल ३१
  • राजापूर बंधारा ४४.०१ 

‘अलमट्टी’तून सव्वादोन लाख क्युसेक विसर्गअलमट्टी धरणात सध्या ९१.२६ टीएमसी पाणीसाठा असून धरण ७४ टक्के भरले आहे. धरणामध्ये एक लाख ७२ हजार क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. म्हणून कर्नाटक पाटबंधारे विभागाने बुधवारी सायंकाळी ७ वाजल्यापासून दोन लाख २५ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

सांगलीत दहा कुटुंबांचे स्थलांतरसांगली शहरातील सूर्यवंशी प्लॉटमध्ये पुराचे पाणी शिरल्याने येथील एकूण १० कुटुंबांचे स्थलांतर महापालिकेने केले. ७ कुटुंबांतील २६ लोकांचे महापालिकेच्या निवारा केंद्रात पुनर्वसन केले असून अन्य तीन कुटुंबांनी नातेवाइकांकडे स्थलांतर केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसfloodपूर