शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

सांगलीतील जत तालुक्यात चारा टंचाई; दर भिडला गगनाला, शेतकऱ्यांना पशुधनासाठी कसरत करावी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 5:43 PM

जनावरे जगविणे अशक्य असल्याने शेतकऱ्यांची कसरत

दरीबडची : कमी झालेली ज्वारीची पेरणी, पावसाअभावी वाया गेलेला खरीप हंगाम यामुळे जत तालुक्यात वैरणीची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. वैरणीचा दर गगनाला भिडला आहे. कडबा पेंडीचा दर १८ ते २२ रुपये आहे. हा आतापर्यंतचा उच्चांकी दर  आहे.तालुक्यात शेती व्यवसायाबरोबरच शेतकरी पशुपालनाचा व्यवसाय केला जातो. तालुक्यात गाई व बैल ७० हजार ९१६, म्हशी ७० हजार ५८, शेळ्या ४५ हजार ९६४, मेंढ्या एक लाख ६२ हजार ८७७  अशी एकूण तीन लाख ४९ हजार ८९५ जनावरे आहेत. या जनावरांना पाच लाख ५१ हजार ९९७ मेट्रिक टन चारा आवश्यक आहे.

सध्याच्या घडीला तीन लाख सात हजार इतका चारा शिल्लक आहे. सध्या ज्वारीच्या वैरणीच्या दरात वाढ झाली आहे. पेंडीचा दर १८ ते २२ रुपये आहे. या दराने कडबा घेऊन जनावरे जगविणे अशक्य असल्याने शेतकऱ्यांची कसरत सुरु आहे.दुभती जनावरे संकटातपाण्याअभावी शेतात ओला चारा नसल्याने दुभती जनावरे संकटात सापडली आहेत. चाऱ्याअभावी दुधाच्या प्रमाणात घट झाली आहे. दूध संकलन कमी झाले आहे.

शेतकऱ्यांना जनावरे जगविणे अवघड झाले आहे. विकतचा कडबा घेऊन जनावरे जगविण्याशिवाय पर्याय नाही. याचा आर्थिक भुर्दंडही बसत आहे.  - विठ्ठल पाटील, पशुपालकगेल्या चार वर्षांतील कडब्याच्या किमती         वर्ष    - एका पेंडीची किंमत                        २०१९   - १७ ते २१  रुपये                  २०२०   - ७  ते १०                        २०२१   - ६ ते ९                        २०२२  -  १० ते १३२०२३   - १८ ते २२ रुपये उच्चांकी

टॅग्स :Sangliसांगली