शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

उरूसातून लोकनाट्य तमाशा नामशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:15 AM

जितेंद्र येवले । इस्लामपूर : इस्लामपुरातील संभुआप्पा-बुवाफन उरुसानिमित्त नामवंत कलाकारांची लोकनाट्य तमाशा मंडळे येत. परंतु ती दोन-तीन वर्षांपासून बंद ...

जितेंद्र येवले ।इस्लामपूर : इस्लामपुरातील संभुआप्पा-बुवाफन उरुसानिमित्त नामवंत कलाकारांची लोकनाट्य तमाशा मंडळे येत. परंतु ती दोन-तीन वर्षांपासून बंद झाली आहेत. त्यामुळे रसिकांचा हिरमोड होत आहे. बाजार समितीच्यावतीने भरविण्यात येणाऱ्या जनावरांच्या प्रदर्शनालाही उतरती कळा आली आहे.इस्लामपूर शहराचे वैशिष्ट्य ठरलेला उरूस कार्तिक पौर्णिमेपासून २० दिवस भरतो. तो शहराचे सांस्कृतिक संचित आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून उरुसानिमित्त येणारी लोकनाट्य तमाशा मंडळे बंद झाली आहेत. पूर्वी जनावरांच्या बाजारानजीकच्या ख्रिश्चन बंगला परिसरातील विस्तीर्ण आवारात ठेकेदार सिध्दू पाटील, प्रताप पाटील, पडवळे नामवंत तमाशा मंडळे रसिकांसाठी आणत. त्यामध्ये मंगला बनसोडे, काळू-बाळू, दत्ता महाडिक-पुणेकर, गुलाबराव बोरगावकर, संध्या करवडीकर या नामवंत कलाकारांच्या फडांचा समावेश असे. परंतु अलीकडील काही वर्षात गावगुंडांचा त्रास, सुरक्षेचा प्रश्न, अपुरी जागा यामुळे हा तमाशाच उरूसातून नामशेष झाला आहे. २००५ मधील उरूसावेळी तमाशांचे तंबू जवळजवळच उभारण्यात आले होते. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर दोन तंबूंमधील कनात काढून सवाल-जवाब हा कलाप्रकार रात्रीच्या खेळावेळी सादर होत होते.बाजार समितीच्या माध्यमातून जनावरांचा बाजार भरविण्यासह स्पर्धेचेही नियोजन करण्यात येते. परंतु येथे येणाºया जनावरांची संख्या घटत चालली आहे. २0१५ मध्ये २६३0, २0१६ मध्ये २२00, २0१७ मध्ये १६00, २0१८ मध्ये १४00, २0१८ मध्ये ११८0, तर यावर्षी २0१९ मध्ये तर केवळ ६२0 जनावरे बाजारात दाखल झाली आहेत. जनावरांच्या बाजारात पुरविण्यात येणाºया सोयी-सुविधा, स्पर्धा यावरील खर्च पाहता, बाजार समितीला तोटाच सहन करावा लागत आहे. प्रत्येकवर्षी खर्च जास्त आणि उत्पन्न कमी होत आहे. यावर्षीचा खर्च ७0 हजार आणि उत्पन्न ४0 हजारांचे मिळाल्याचे बाजार समितीचे सचिव विजयकुमार जाधव यांनी स्पष्ट केले.कुस्ती मैदानही बंदउरूसानिमित्त पेठ-इस्लामपूर रोडवरील सुरेश ढाब्यासमोरील मोकळ्या जागेत कुस्ती मैदान भरवले जात होते. नामवंत मल्लांच्या कुस्त्या येथे खेळवल्या जात होत्या. परंतु हे कुस्ती मैदानही १९९० पासून बंद पडले आहे.