फोटो ओळ : पलूस येथे कोरोनाबाबत आढावा बैठकीत कृषिराज्य मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महेंद्र लाड, गणेश मरकड, निवास ढाणे, खाशाबा दळवी, जितेश कदम, वैभवराव पुदाले, सुहास पुदाले, ऋषिकेश लाड उपस्थित होते.
पलूस : सध्या कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. पलूस तालुक्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन दक्षपणे काम करीत आहे. शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यावी, असे आवाहन कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केले.
पलूस येथे तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत मंत्री डॉ. कदम बोलत होते. जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार निवास ढाणे, खाशाबा दळवी, जितेश कदम, वैभवराव पुदाले, सुहास पुदाले, ऋषिकेश लाड होते.
डॉ. कदम म्हणाले, राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. लाॅकडाऊनचा निर्णय सर्वांना विश्वासात घेऊन घेतला जाणार आहे. पलूस तालुक्यातील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यासाठी महसूल, आरोग्य, पोलीस व इतर प्रशासन दक्षपणे काम करीत आहे. मात्र, नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.
पलूस व कडेगाव तालुक्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. नागरिकांनी त्वरित लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन डॉ. कदम यांनी केले.
यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. रागिणी पवार, सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
चाैकट
व्यापाऱ्यांचा विचार
शासनाने कडक लाॅकडाऊनचा निर्णय घेतला, तरी शासन व्यापारी, दुकानदार यांच्याबाबतीत सकारात्मक विचार करत आहे. कोरोनाच्या परिस्थितीत सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. असे डॉ. कदम यांनी सांगितले.