शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

Sangli: अवैध वाळूची माहिती दिल्यामुळे पांढरेवाडीत पोलिस पाटलास मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल 

By अशोक डोंबाळे | Published: December 19, 2023 1:59 PM

वाळू तस्करांवर कारवाईची मागणी

सांगली : पांढरेवाडी (ता. जत) येथील पोलिस पाटील धर्मराज बाळाप्पा शिंदे (वय ४६) यांना अवैध वाळू वाहतुकीची माहिती प्रशासनाला दिली म्हणून चौघांनी काठीसह लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चौघांविरोधात उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.संशयित आरोपी श्रीमंत कामा करपे, मल्हारी जयाप्पा करपे, जयाप्पा कामा करपे, महादेव बाबू तांबे (सर्व रा. पांढरेवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस पाटील शिंदे हे दरीबडची व संख गावाकडे जाणाऱ्या रोडजवळ थांबून अवैध वाळू उपसा व वाळू वाहतुकीची माहिती संख अपर तहसीलदार यांना मोबाईलवरून देत होते.यावेळी श्रीमंत कामा करपे, मल्हारी जयाप्पा करपे, जयाप्पा कामा करपे, महादेव बाबू तांबे यांनी संगनमत करून त्यांचे पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीतून फिर्यादीजवळ येऊन अवैद्य वाळू उपसा वाळू वाहतुकीची माहिती अपर तहसीलदार यांना देऊ नको, असे म्हणून फिर्यादीस धमकी दिली. त्यानंतर वादावादी झाल्यानंतर काठीने फिर्यादीच्या डोक्यात मारहाण करून जखमी केले. लाथाबुक्क्याने मारहाण करून, शिवीगाळ दमदाटी केली. तहसीलदार व पोलिस ठाण्याच्या परवानगीने पोलिस पाटील यांनी उमदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

वाळू तस्करांवर कारवाईची मागणीजत तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी होत आहे. अवैध वाळू वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिस पाटील यांना मारहाण होत आहे. या घटनेचा पोलिस पाटील संघटनेकडून निषेध व्यक्त केला आहे. तसेच वाळू तस्करी रोखण्यासाठी महसूल आणि पोलिसांनी एकत्रित कारवाई करण्याची गरज आहे, अशीही पोलिस पाटील संघटनेची मागणी आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस