शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
8
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
9
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
10
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
11
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
12
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
13
ऑनलाइन तेल पडले महागात! अमेरिकेत मुलाची केस गळती, वाशीतल्या वडिलांना लाखोंचा गंडा
14
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
15
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
16
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
17
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
19
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 

मगरीचे बळी वाढताना वन खात्याचा कागदी खेळ

By admin | Published: October 21, 2016 1:30 AM

प्राणीमित्रांचा अडसर : ग्रामस्थ संतप्त; सात बळी, तर चाळीसहून अधिक जखमी

सोमनाथ डवरी ल्ल कसबे डिग्रज कृष्णा नदीत औदुंबर डोह ते सांगली पुलापर्यंत मगरींचा मोठा वावर आहे. यामुळे आतापर्यंत मगरीच्या हल्ल्यात सातवा बळी गेला असून, चाळीस जण जखमी झाले आहेत. तसेच कित्येक शेळ्या, मेंढ्या, कुत्री यांचाही जीव गेला आहे. प्राणी गणनेनुसार या परिसरातीत नदीपात्रात १९ मोठ्या आणि ३९ लहान मगरी आहेत. वन विभाग प्रत्येक दुर्घटनेनंतर कागदी घोडे नाचवितो. प्राणीमित्रांचे कारण देतो. यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, मगरींच्या हल्ल्यात अजून किती बळी जाणार, असा प्रश्न उभा आहे. आतापर्यंत अनिकेत कदम (रा. कसबे डिग्रज, २९ एप्रिल २००३), रामचंद्र नलवडे (भिलवडी, ११ सप्टेंबर २००४), सुनील भोसले (अंकलखोप, १६ मार्च २००७), वसंत मोरे (भिलवडी, २९ मार्च २०१५), अजय जाधव (चोपडेवाडी, २० एप्रिल २०१५) आणि नुकताच संजय भानुसे (तुंग) यांचा सातवा, असे मगरबळी गेले आहेत. सुमारे ४० नागरिकांवर मगरींनी हल्ले केले आहेत. पण मोटारी सुरू करणे, वैरण काढणे, जॅकवेल परिसरातील कामे, धुणे धुणे, अंघोळीसाठी अशा विविध कारणांनी नदीवर ग्रामस्थांना जावेच लागते. औदुंबर डोह ते सांगली पुलापर्यंत वन विभागाने ९ जून २०१५ रोजी केलेल्या मगरींच्या गणनेत १९ मोठ्या व ३९ लहान मगरी आढळल्या आहेत. एक मगर एका गर्भारपणात सुमारे ४०-५० पिली देते. यातील चार-पाच जरी प्रौढ झाली तरी, मगरींच्या संख्येचे भीषण वास्तव समोर येते. २००३ मध्ये अनिकेत कदमच्या मृत्यूनंतर सुमारे दोन महिने पिंजरा लावला होता आणि आता संजय भानुसे यांच्या मृत्यूनंतरही मगर पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. पण मगर एकदाही सापडली नाही. त्यामुळे हा नुसताच खेळखंडोबा ठरला आहे. याचदरम्यान काही प्राणीमित्र कायद्याची भीती दाखवत मगर पकडण्यात अडसर करतात. ‘नदीवर लोकांनी जाऊ नये किंवा मगरींचा प्रतिकार करा, ठोसे लावा, डोळा फोडा, पडजीभ दाबा’ यासारखे उपाय मगरीपासून जीव वाचविण्यासाठी ते सांगतात. त्यावेळी ग्रामस्थ ही प्रात्यक्षिके करून दाखविण्याचे आवाहन करतात. काही वेळेला जबाबदारी टाळण्यासाठी प्राणी मित्रांना वन विभागच पुढे करतो का? अशा प्रकारची शंका ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. उदासीनता झाकण्यासाठी वन विभाग असे प्रकार करतो, असा आरोप होत आहे. वन विभागाकडून जखमींकरिता ५० हजार, गंभीर जखमींना एक लाख, तर मृतासाठी आठ लाख मदतीची घोषणा होते, मात्र प्रत्यक्षात कागदपत्रे गोळा करताना त्यांच्या कुटुंबीयांना मोठा त्रास होतो. त्यामुळे ही मदत नक्की मिळते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कागदी घोडे नाचविण्यात वनविभाग धन्यता मानत आहे. सध्या नदीला मगर प्रतिबंधित संरक्षक जाळी बसविणे, सर्व्हेतून व प्रस्ताव सादर करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी संमती आणि परिपत्रक काढले आहे. पण या जाळीचा उपयोगही किती होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.