शिराळा : कापरी (ता. शिराळा) येथील शेडमध्ये मडकी, पोते व पिशवीमध्ये ठेवलेले नाग वनविभागाने कारवाई करून जप्त केले. या नागांची आरोग्य तपासणी करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले आहे.
कापरी येथे नाग बंदिस्त करून ठेवले असून, त्यांचे प्रदर्शन होणार असल्याची माहिती एका निनावी दूरध्वनीवरून १९२६ हेल्पलाईनवरून मिळाली होती. यानंतर शिराळा व सांगली येथील वन विभागाच्या पथकाने कापरी येथील शेडमध्ये छापा टाकला. यावेळी शेडमध्ये ठेवलेले १९ नाग जप्त केले. या जप्त नागांची इस्लामपूर येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वैदयकीय तपासणी केली. याबाबत वनविभागाने अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून उपवनसंरक्षक विजय माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक विजय गोसावी हे तपास करीत आहेत.