निवेदनात म्हटले की, रस्त्यावरील सर्व प्रकारचे अतिक्रमण काढून नागरिकांना रस्ता खुला करावा. शाळा नं. दोनशेजारील स्वच्छतागृह काढून टाकावे, शहरातील व परिसरातील निकृष्ट कामांचे स्पेशल ऑडिट करून त्याचा रिपोर्ट नागरिकांसाठी जाहीर करावा. बेकायदेशीर डिजिटल फलकांवर कारवाई करावी, रिंग रोडचे प्रलंबित काम सुरू करावे यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर दखल घेऊन या मागण्यांची कार्यवाही न केल्यास नजीकच्या काळात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
या वेळी दत्ताकाका थोरबोले, सदाआबा सासने, सदाभाऊ माळी, दत्ता पोतदार, पांडुरंग जाधव, समीर कोळी, विजय जाधव, कुमार माळी, राजू माळी, चंद्रशेखर पोळ, प्रवीण कांबळे, राहुल बाबर आदी पदाधिकाऱ्यांसह जिल्हा सहचिटणीस अर्जुन थोरात यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, भाजपचे गटनेते जाफर मुजावर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली झाली.