शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार न बनणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय; शरद पवारांची टीका
2
शेकडोंचा जमाव, घोषणाबाजी, दगड-विटांचा मारा, बांगलादेशात तीन मंदिरांची तोडफोड
3
Kalki Koechlin : "मी पैशासाठी अनेक गोष्टी..."; २ वर्षे काम नाही; वडापाव खाऊन अभिनेत्रीने काढले दिवस
4
"मोबाईल दुरुस्त करा."; १४ वर्षांचा लेकाचा हट्ट; बापाने बेदम मारहाण करून घेतला जीव
5
मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगली, भाजप धक्कातंत्र वापरणार?; मोहोळांनी स्वत: खुलासा करत संपवला सस्पेन्स 
6
एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर
7
'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेनं लग्नात हिंदीमध्ये घेतला हटके उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
INDU19 vs PAKU19 : भारताविरुद्धच्या हायहोल्टेज सामन्यात टॉस जिंकून पाक संघानं घेतली बॅटिंग
9
'स्त्री 2'मधल्या आयटम साँगला तमन्ना भाटिया देणार होती नकार, म्हणाली, "मला ते गाणं..."
10
Pre Approved Loan : काय असतं प्री अप्रुव्ह्ड लोन? सामान्य कर्जापेक्षा कमी असतो का व्याजदर? अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या
11
"निवडणूक आयोग कुत्रा बनून मोदींच्या दारात बसलाय’’, टीका करताना भाई जगताप यांची जीभ घसरली
12
Post Office Investment : पोस्टाची 'ही' स्कीम तुम्हाला करेल मालामाल, केवळ ५ हजारांची गुंतवणूक; काही वर्षांत बनाल लखपती
13
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! नावाची घोषणा नंतर करणार; दिल्लीच्या बैठकीत काय घडलं?
14
श्रद्धा-अर्जुन कपूरला एकत्र पाहून चाहत्यांना आठवला 'हाफ गर्लफ्रेंड', म्हणाले, "दोघं पुन्हा..."
15
महाराष्ट्रात जे उपमुख्यमंत्री बनलेत, ते कधीच...; देवेंद्र फडणवीस कुणालाही न जमलेली किमया साधणार?
16
मुख्यमंत्रिपदावर पेच, शपथविधी लांबणीवर; ५ डिसेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होणार?
17
PAN 2.0: नवीन पॅन कार्डमुळे फसवणूक करणं खूप अवघड, जाणून घ्या सर्वसामान्यांना कसं मिळणार संरक्षण?
18
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चांगली बातमी मिळू शकेल, धनलाभ संभवतो!
20
विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?

जिल्हा बँकेच्या फॉर्म्युल्याने राष्ट्रवादी पेचात

By admin | Published: July 02, 2015 11:39 PM

बाजार समिती निवडणूक : खासदारांशी सांगलीत सोबत, तर तासगावात विरोधाची भूमिका

दत्ता पाटील -तासगाव -तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे धूमशान सुरू झाले असतानाच, सांगलीतही बाजार समितीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सांगलीसाठी जिल्हा बँकेचा आघाडीचा फॉर्म्युला वापरण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तसे झाल्यास कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रवादी पुन्हा एकदा आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली खासदार संजय पाटील यांच्यासोबत राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे तासगाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खासदारांच्या विरोधात लढण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रवादी पेचात सापडल्याचे दिसत असून, दोन्ही निवडणुकांत आर. आर. आबा समर्थक कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक १ आॅगस्टला होणार आहे. या निवडणुकीसाठी तालुक्यातील राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही तुल्यबळ पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. दोन्ही पक्षांनी पॅनेल लावण्याची तयारी सुरू केली असली तरी, आघाडीबाबतही चर्चा होत आहे. भाजपकडून आघाडीसाठी खासदार संजय पाटील यांनी सुरुवातीलाच तयारी दर्शवली होती. राष्ट्रवादीत आघाडी करायची की स्वबळावर लढायचे, याबाबत एकमत होत नाही. परंतु स्वबळावर लढण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. काही दिवसांपूर्वी आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली होती. यावेळी बहुतांश कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्याचीच मागणी केली होती. आमदार पाटील यांनीही, आपली लढाई खासदार संजयकाकांशी आहे, असे सांगून, तुम्ही एकसंध असाल, तर माझी कोणतीच हरकत नाही, असे म्हटले होते.एकीकडे तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी खासदारांच्या विरोधात शड्डू ठोकण्याची भाषा तासगाव तालुक्यातील आर. आर. पाटील समर्थकांतून होत असतानाच, दुसरीकडे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आखाड्यात मात्र जिल्हा बँकेचा फॉर्म्युला अंमलात येणे निश्चित आहे. सांगली बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात कवठेमहांकाळ तालुक्याचा समावेश आहे. त्यामुळे या तालुक्यातील आर. आर. पाटील समर्थक जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीत सामील होणार, हे स्पष्टच आहे. परिणामी सांगलीच्या निवडणुकीत आर. आर. पाटील समर्थक खासदार संजय पाटील यांच्यासोबत एकत्र येणार आहेत. त्यातूनच कवठेमहांकाळ तालुक्यात खासदारांच्या सोबत राहायचे आणि तासगाव तालुक्यात खासदारांच्या विरोधात लढायचे का, असा प्रश्न राष्ट्रवादीतच उपस्थित झाला आहे. दोन्ही ठिकाणच्या भिन्न भूमिकांमुळे नेमका कोणता निर्णय घ्यायचा, याबाबत राष्ट्रवादी पेचात सापडल्याचे दिसून येत आहे.सर्वाधिकार जयंत पाटील यांना राष्ट्रवादीची तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्याची जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर सोपविली आहे. जिल्हा बँकेनंतर सांगली बाजार समितीसाठी पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. त्यामुळे पाटील यांच्या बेरजेच्या राजकारणात बाजार समितीच्या निवडणुकीत कोणता निर्णय घेतला जाईल, याचा अंदाज आर. आर. पाटील समर्थकांना आलेला नाही.४तासगाव बाजार समितीची निवडणूक स्वबळावर लढायची की भाजपशी आघाडी करून लढायची, याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. ४ जुलैला जयंत पाटील यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. त्यावेळी स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. मात्र भाजपसोबत आघाडी करण्याचा निर्णय झाल्यास, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या टप्प्यातच याबाबत भूमिका स्पष्ट होईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे याचा फैसला केव्हा होणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.