शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
2
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
3
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
4
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
5
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
6
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
7
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
8
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
9
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
10
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
11
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
12
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
13
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
14
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
15
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत
16
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
17
VIDEO: इम्तियाज जलील यांची घोषणा; विधानसभेसह नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही लढवणार
18
IND vs NZ : भारताची लाजिरवाणी कामगिरी; रोहितकडून मोठ्या चुकीची प्रामाणिक कबुली, म्हणाला...
19
'मिट्टी में मिला देंगे...', उत्तर प्रदेशातील 'योगी'राजमध्ये सात वर्षात 12 हजार एन्काउंटर
20
"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले

विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 7:55 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशा दुरंगी लढतीची शक्यता व्यक्त होत आहे.

दत्ता पाटील, तासगाव : तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीत महायुतीचा पेच अद्याप सुटला नाही. मात्र या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडणूक रिंगणात असेल, अशी शक्यता आहे. भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे निश्चित आहे. त्यामुळे प्रभाकर पाटील लवकरच 'घड्याळ' हातात बांधणार असल्याची चर्चा आहे. यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी दुरंगी लढतीची शक्यता व्यक्त होत आहे.

तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून विद्यमान आमदार सुमनताई पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट आहे. महायुतीच्या फॉर्म्युल्याचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नाही. गतवेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेकडून तत्कालीन राज्यमंत्री अजितराव घोरपडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यावेळी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महायुतीत हा मतदारसंघ नेमका कोणाकडे जाईल, हे स्पष्ट झाले नाही. 

भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रभाकर पाटील निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार हे निश्चित आहे. मात्र महायुतीत हा मतदारसंघ नेमका कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाईल, याबाबत चित्र स्पष्ट झाले नाही. परंतु हा मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाईल,अशी चर्चा आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसकडे या मतदारसंघात सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे प्रभाकर पाटील लवकरच 'घड्याळ' हातात बांधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. माजी खासदार संजय पाटील राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठाण मांडून आहेत. त्यामुळे लवकरच या मतदारसंघात मोठी बराजकीय उलथापालथ पाहायला मिळणार आहे.

अजितराव घोरपडे यांची भूमिका गुलदस्त्यातच -लोकसभा निवडणुकीत माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी खासदार विचार पाटील यांची धुरा सांभाळली होती. या निकालानंतर घोरपडे गट रिचार्ज झाला होता. त्यामुळे अजितराव घोरपडे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, असा दावा घोरपडे गटाच्या कार्यकर्त्यांकडून होत होता. मात्र अद्याप घोरपडे यांची भूमिका गुलदस्त्यातच आहे. त्यांच्या भुमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :tasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळSangliसांगलीRohit Patilरोहित पाटिल