शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
2
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
3
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
4
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
5
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
6
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
7
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
8
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
9
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
10
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
11
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
12
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
13
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
14
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
15
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
16
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
17
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
18
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
19
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
20
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार

भाजपचे माजी खासदार संजयकाकांनी घेतली शरद पवारांची भेट, सांगली जिल्ह्यात राजकीय वर्तुळात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 7:28 PM

दत्ता पाटील तासगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात उलतापालच सुरू असतानाच भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांनी राष्ट्रवादी ...

दत्ता पाटीलतासगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात उलतापालच सुरू असतानाच भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुणे येथे मोतीबागेत बुधवारी भेट घेतली. पाटील यांच्या भेटीने सांगली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.लोकसभा निवडणुकीत भाजपच्या काही नेत्यांनी तत्कालीन खासदार संजय पाटील यांना लोकसभेची उमेदवारी मिळू नये यासाठी विरोध केला होता. तरीही भाजपकडून पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. निवडणुकीत भाजपमधूनच अंतर्गत विरोध झाला. त्याचा फटका माजी खासदार संजय पाटील यांना बसला. त्यामुळेच संजय पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यासह राज्यभरात मोठी उलथापालथ होत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी हातात घेण्यासाठी राज्यातील अनेक बडे नेते तयारीत असतानाच भाजपचे नेते आणि सांगलीचे माजी खासदार संजय पाटील यांनी बुधवारी पुणे येथे शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील हे भाजपकडून तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून रोहित पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात राजकीय संघर्ष सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

अशा परिस्थितीत माजी खासदार संजय पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली असून सांगली जिल्ह्यात या भेटीने खळबळ उडाली आहे.

सांगलीतील मराठा समाज सांस्कृतिक भवन मधील  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा 4 ऑक्टोंबर रोजी सांगलीत होणार आहे. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्षपद माझ्याकडे आहे त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यासाठी शरद पवारांची पुणे येथे भेट घेतली होती. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. - संजय पाटील, माजी खासदार,

टॅग्स :Sangliसांगलीsanjaykaka patilसंजयकाका पाटीलSharad Pawarशरद पवार