शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

Sangli: इद्रीस नायकवडी यांच्या माध्यमातून मिरजेला आणखी एक आमदार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 5:05 PM

मिरज : राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे माजी महापौर इद्रीस नायकवडी यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती झाली. ...

मिरज : राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे माजी महापौर इद्रीस नायकवडी यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती झाली. त्यामुळे अनेक वर्षांनंतर मिरजेला विधान परिषदेवर संधी मिळाल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये उत्साह निर्माण झाला आहे.सध्या इद्रीस नायकवडी हे राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष आहेत. मुस्लीम समाजाची नाराजी दूर करण्यासाठी नायकवडी यांना संधी मिळाल्याची राजकीय गोटात चर्चा आहे. राष्ट्रवादीत फूट पडून ज्येष्ठ नेते शरद पवार व अजित पवार असे दोन गट पडले. त्यावेळी सांगली जिल्ह्यातील माजी मंत्री जयंत पाटील यांचे विरोधक मानले जाणारे इद्रीस नायकवडी यांनी अजित पवार गटात पक्षप्रवेश केला. त्यानंतर महापालिका क्षेत्रात त्यांनी अजित पवार गटात विविध नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे प्रवेश घडवून आणले होते. त्यामुळे नायकवडी यांना ताकद देण्यासाठी अजित पवार यांनी त्यांची विधान परिषदेसाठी शिफारस केल्याचे बोलले जात आहे.जयंत पाटील गटाला धक्कासांगली व मिरजेतील काही माजी नगरसेवक महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार गटाच्या संपर्कात आहेत. काही महिन्यांपूर्वी अजित पवार सांगली दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यात इद्रीस नायकवडी यांना ताकद देऊन जयंत पाटील यांना धक्का देण्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर इद्रीस नायकवडी यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजPoliticsराजकारणAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMLAआमदार