सुरेंद्र शिराळकरआष्टा: आष्टा-वडगाव मार्गावर बागणीनजीक दुचाकी व टेम्पो अपघातात आष्टयाचे माजी नगराध्यक्ष अरुण यशवंत मोटकट्टे (वय ६५) जागीच ठार झाले. तर दगडू गणपती लोंढे (७०, रा. ढवळी) हे गंभीर जखमी झाले. हा अपघात आज, मंगळवारी सकाळच्या सुमारास झाला.घटनास्थळ व आष्टा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माजी नगराध्यक्ष अरुण मोटकट्टे हे म्हैस खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. याकामानिमित्त ते दुचाकीवरुन बागणीकडे गेले होते. त्याच्यासोबत दगडू लोंढे होते. दरम्यान आष्टा-बागणी वडगाव मार्गावर टेम्पोने मोटकट्टे यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. या धडकेत अरुण मोटकट्टे यांना जोरदार मार लागल्याने ते जागीच ठार झाले, तर दगडू लोंढे हे गंभीर जखमी झाले. जखमी लोंढेंना तातडीने सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.अरुण मोटकट्टे हे माजी आमदार विलासराव शिंदे यांचे समर्थक होते. शिंदे यांनी अरुण मोटकट्टेंना नगराध्यक्ष पदाची संधी दिली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अपघाताचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर करीत आहेत.
सांगली: आष्ट्याचे माजी नगराध्यक्ष अरुण मोटकट्टे अपघातात ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 18:00 IST