शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'राष्ट्रवादी'शी एकनिष्ठच राहणार, भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चेला जयंत पाटील यांनी दिला पूर्णविराम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 19:11 IST

समडोळी : हिंदवी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून युवानेते अभिजित कोळी यांच्या संकल्पनेतून सांगलीवाडी (ता. मिरज) येथे सुरू केलेली जयंत जनसेवा ...

समडोळी : हिंदवी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून युवानेते अभिजित कोळी यांच्या संकल्पनेतून सांगलीवाडी (ता. मिरज) येथे सुरू केलेली जयंत जनसेवा नागरी सुविधा केंद्र हे नागरिकांच्या दृष्टीने वेळ आणि पैशाची बचत करणारे विनाशुल्क दालन निश्चितपणे उपयुक्त ठरेल असा विश्वास माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.सांगलीवाडीत शनिवारी आयोजित केलेल्या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज होते.

मी भाजपामध्ये जाणार अशी वावडी काहीजणांकडून उडवली जात आहे त्यात काही तथ्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसशी मी एकनिष्ठ आहे, एकनिष्ठच राहणार आहे. तुमच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध आहे, अशी ग्वाही देत जयंत पाटील यांनी पक्षप्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

एकाच छताखाली सोयसांगलीवाडी येथील सर्वच घटकांना एकाच छताखाली आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड संबंधित शैक्षणिक दाखले मतदान, ओळखपत्र, शॉप ॲक्ट लायसन, प्रॉपर्टी कार्ड, जन्ममृत्यू प्रमाणपत्र, रहिवासी दाखले, सातबारा उतारा यासह शासकीय कामाच्या पूर्ततेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची सोय या केंद्राद्वारे विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पाटील म्हणाले, सांगलीवाडी या गावांमध्ये अद्याप एकोपा कायम आहे. सर्वांना समान न्याय या तत्त्वावर विकासकामासाठी कमी पडणार नाही. अभिजित कोळी यांनी जयंत जनसेवा नागरी सुविधा केंद्राच्या संकल्पनेची माहिती दिली. यावेळी माजी नगरसेविका अर्पणा कदम, महाबळेश्वर चौगुले, सच्चिदानंद कदम, कमल गोरे, मदन पाटील विजय पाटील, आकाराम कदम, सचिन चव्हाण, सुनील चव्हाण, श्यामराव मगदूम उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारBJPभाजपा