शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

तंतुवाद्यांच्या कच्च्या मालावर जीएसटीची कु-हाड, निर्मिती व्यवसायाला फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 8:27 PM

राज्यात एकमेव असलेल्या मिरजेतील तंतुवाद्य निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी सतार, तंबोरा, सरोद ही तंतुवाद्ये वस्तू व सेवाकरातून (जीएसटी) वगळण्यात आली आहेत; मात्र सतार व तंबोरा या तंतुवाद्यांसाठी लागणारे लाकूड, तारा, प्लॅस्टिक, रंग यासह इतर कच्च्या मालावर जीएसटी आकारण्यात येत असल्याने तंतुवाद्याच्या किमती वाढल्या आहेत.

- सदानंद औंधे

मिरज, दि. 12 - राज्यात एकमेव असलेल्या मिरजेतील तंतुवाद्य निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी सतार, तंबोरा, सरोद ही तंतुवाद्ये वस्तू व सेवाकरातून (जीएसटी) वगळण्यात आली आहेत; मात्र सतार व तंबोरा या तंतुवाद्यांसाठी लागणारे लाकूड, तारा, प्लॅस्टिक, रंग यासह इतर कच्च्या मालावर जीएसटी आकारण्यात येत असल्याने तंतुवाद्याच्या किमती वाढल्या आहेत. अगोदरच अडचणीत असलेल्या तंतुवाद्य निर्मिती व्यवसायास दरवाढीचा फटका बसला आहे.  तंतुवाद्य निर्मितीची दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या मिरजेत तंतुवाद्य निर्मिती कारागीरांच्या पाच पिढ्या या व्यवसायात आहेत. मिरजेतील तंबोरा व सतार या दर्जेदार तंतुवाद्यांनी संपूर्ण देशात व परदेशात लौकिक मिळविला आहे. तंतुवाद्याचा मधुर व सुरेल आवाज, टिकावूपणा, सुबकता यामुळे मिरजेतील सतार व तंबो-यांना विविध मानसन्मान मिळाले आहेत. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतकला टिकविण्याचे श्रेय तंतुवाद्य कारागीरांनाही आहे; मात्र विविध अडचणींमुळे मिरजेतील तंतुवाद्य निर्मिती कारागीरांची संख्या घटत आहे. महागाई, तंतुवाद्य निर्मितीतून मिळणारे अपुरे उत्पन्न, इलेक्ट्रॉनिक वाद्यांचे आक्रमण अशा विविध कारणांमुळे अडचणीत असलेली तंतुवाद्य निर्मिती कला कच्च्या मालावर जीएसटी आकारणीमुळे आणखी अडचणीत आली आहे. इलेक्ट्रॉनिक तानपु-याच्या आक्रमणामुळे तंतुवाद्य निर्मिती व्यवसायाला मोठा फटका बसला. तंतुवाद्यांची घटलेली मागणी, कच्च्या मालाचे वाढत्या दरामुळे तंतुवाद्य कारागीरांची संख्या कमी होत आहे. अत्यंत कष्टाचे काम व तुटपुंज्या उत्पन्नामुळे कारागीरांची संख्या कमी होऊन नवी पिढी व्यवसायात येण्यासाठी इच्छुक नाही. या पार्श्वभूमीवर कच्च्या मालावर जीएसटी आकारणीमुळे तंतुवाद्यांची दरवाढ होऊन व्यवसायावर परिणाम होण्याची भीती आहे. राज्य शासनाने तंतुवाद्य निर्मितीस हस्तकलेचा दर्जा देऊन  तंतुवाद्य निर्मिती व्यवसायासाठी मिरजेत क्लस्टर मंजूर केले आहे. क्लस्टर योजनेअंतर्गत तंतुवाद्य कारागीरांना विमा, दुकाने, संशोधन व निर्मितीसाठी शासनाच्या जागेत सामुदायिक सुविधा केंद्र निर्मितीसाठी पहिल्या टप्प्यात ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. क्लस्टर योजनेसाठी सुमारे दोनशे तंतुवाद्य कारागीरांची यादी तयार करण्यात आली आहे. मात्र क्लस्टर योजनेअंतर्गत शासनाचे अनुदान व सुविधा मिळविण्यासाठी २० टक्के रक्कम भरण्याची अट असल्याने ही योजना रखडली आहे. तंतुवाद्य निर्मितीसाठी शासनाचे प्रोत्साहनाचे धोरण असताना, दुस-या बाजूला कच्च्या मालावर जीएसटी आकारणीमुळे व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होणार असल्याचे तंतुवाद्य कारागीरांनी सांगितले. कर आकारणी रद्द करण्याची मागणी...देशातील अनेक दिग्गज कलाकार मिरजेत तयार झालेल्या सतार व तंबो-याचा वापर करतात. मिरजेच्या सतार व तंबो-यास परदेशातही मागणी आहे. विशिष्ट, मजबूत, टिकाऊ भोपळ्यामुळे मिरजेतील सतार, तंबो-याचा देशात लैकिक आहे. कच्च्या मालाच्या दरात जीएसटीमुळे वाढ झाल्याने वाद्यांच्या दरात पंधरा टक्के वाढ होणार आहे. मिरजेतील तंतुवाद्यांना कोलकाता व लखनौ येथील स्वस्त दराच्या तंतुवाद्याशी स्पर्धा करावी लागते. या सर्व प्रतिकूल परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या तंतुवाद्य व्यवसायासाठी लागणा-या कच्च्या मालावरील जीएसटी आकारणी रद्द करण्याची मागणी मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट कंपनीचे अध्यक्ष मोहसीन मिरजकर यांनी केली.