अझहर अली, संग्रामपुर : तीन जिल्ह्याच्या सिमेवर बांधलेल्या वान प्रकल्पाचे (हनुमान सागर धरण) चार दरवाजे अर्धा मीटरने गुरूवारी संध्याकाळी उघडण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणातुन वान नदी पात्रात ११९ क्युसेक नी पाण्याचा विसर्ग सुरू असुन नदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला. गत पाच दिवसापासुन सतत पाऊस सुरू असल्याने नदी नाले दुथडी भरून वाहु लागले आहे. बुधवारी रात्री पावसाने धरण परीसरात जोरदार हजेरी लावल्याने वान धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठ्यात वाढ झाली. सद्यास्थिती धरणात ७५ टक्के जलसाठा उपलब्ध असुन धरणातील जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याने धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या सिमेवर बांधलेले हनुमान सागर धरण धरणातुन अकोला जिल्ह्यासह बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहर व खारपान पट्टयातील संग्रामपुर व जळगाव जा. तालुक्यातील १४० गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. वान नदी पात्रावर उभारण्यात आलेले हे धरण शेकडो गावातील लाखो लोकांची तहान भागवत आहे. यावर विज निर्मिती संच उभारण्यात आला असुन त्या संचाची क्षमता १ हजार ५०० किलो मेगावँट आहे. येथे एक हजार किलो मेगावँट विज निर्मिती करण्यात येते. या विज प्रकल्पावरून अकोला जिल्ह्यातील हिवरखेड उप केंद्राला विज पुरवठा करण्यात येतो. तसेच अकोला जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला या धरणातुन पाठाच्या माध्यमातुन पाणी मिळते. त्यामुळे वारी हनुमान येथील धरण या भागातील जनतेसाठी जिवनदायी ठरत आहे. धरणामधील जलसाठ्यात वाढ होत असल्याने या भागात पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाणि उपलब्ध होणार आहे. वारी येथील धरणाची सि लेव्हल (समुद्र सपाटी) पासुन ४०३.७१ मिटर आहे. धरणाचे चार गेट अर्ध्या मीटर पर्यंत उघडण्यात आल्याने वान नदीपात्रात पाण्याची पातळी वाढ झाली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणुन नदी पात्र काठाच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला.
वान प्रकल्पाचे चार दरवाजे अर्धा मीटर उघडले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 8:52 PM