सांगली, दि. 4 - सोशल मीडियावरुन जुन्या घटनांची चित्रफीत व्हायरल केल्याप्रकरणी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कोल्हापूर जिल्ह्यात छापे टाकून व्हॉटस् अॅप ग्रुुपच्या चार अडमिनना प्रतिबंधात्मक कारवाईखाली अटक केली आहे. रविवारी याच ग्रुपमधील चौघांना अफवा पसरविल्याप्रकरणी अटक केली होती.अटक केलेल्यामध्ये नितीन कुबेर जोग (वय २८), उमेश धोंडीराम जोग (२७, दोघे रा. माणगाव, ता. हातकणंगले), विजय बाळासाहेब चौगुले (२०) व सौरभ सारंग चौगुले (१९, उचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांचा समावेश आहे. नितीश व उमेश जोग दुश्मनोंका आशिर्वाद या ग्रुपचे, तर विजय व सौरभ चौगुले एबीएस तालीम ग्रुपचे अॅडमिन आहेत. ग्रुपचे अॅडमिन म्हणून या चौघांची जबाबदारी आहे. त्यांनी त्यांच्या ग्रुपवर अफवा पसरविणारी चित्रफीत पडल्यानंतर स्थानिक पोलिसांना याची माहिती देणे आवश्यक होते. पण त्यांनी तसे केले नाही. उलट त्यांच्या ग्रुपवर पडलेल्या या चित्रफीतचा दुसºया ग्रुपवर झपाट्याने प्रसार झाला. त्यामुळे ग्रुप अॅडमिनवरही कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक राजन माने यांच्या पथकाने रविवारी रात्री कोल्हापूर जिल्ह्यातील उचगाव व माणगाव येथे छापे टाकून चार अॅडमिनना अटक केली. दोन दिवसात छडागणशोत्सवाच्या धामधूमीत जुन्या घटनांच्या चित्रफीत सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. त्यामुळे पुन्हा अनुचित प्रकार घडला की काय? अशी लोकांमध्ये शंका निर्माण झाली. ते एकमेकांना संपर्क साधून चौकशी करुन लागले. ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. पण अफवा पसरविणाºयांवर कारवाई केली पाहिजे, या उद्देशाने पोलिसांनी दोन दिवसाचा याचा छडा लाऊन सहाजणांना अटक केली. कोल्हापूर पोलिसांनीही दोघांना अटक केली आहे.
सोशल मीडियावरील अफवा प्रकरणी कोल्हापूरच्या चार ग्रुप अॅडमिनना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 9:11 PM