शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

मोहनराव कदम यांच्यासह कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण; शांताराम कदम यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 14:03 IST

स्वतः शांताराम कदम यांनी दूरध्वनीवरुन पत्रकारांना माहिती दिली.

सांगली : सांगली-सातारा विधानपरिषद  मतदारसंघाचे आमदार मोहनराव कदम यांच्यासह त्यांच्या पत्नी यशोदा व त्यांचे पुत्र सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम व नातू दिग्विजय कदम यांना  कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः शांताराम कदम यांनी दूरध्वनीवरुन पत्रकारांना माहिती दिली.

काही  दिवसांपूर्वीच आमदार मोहनराव कदम यांचे पुत्र व भारती हॉस्पिटल, सांगलीचे मानद संचालक डॉ. हणमंतराव कदम व नातू डॉ. जितेश कदम तसेच डॉ. जितेश यांच्या मातोश्री यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समजले. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी आमदार मोहनराव कदम यांच्यासह कुटुंबातील  चौघांचा कोरोनाची चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय आमदार मोहनराव कदम यांचे वाहनचालक पिंटू मोकळे, शांताराम कदम यांचे स्वीय सहाय्यक विश्वास महाडिक, संपर्कातील इरप्पा कोळी हा कार्यकर्ता असे एकंदरीत सात जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतानाच एकूण कोरोना प्रतिबंधाच्या नियोजन प्रक्रियेत मार्गदर्शकाची भूमिका पार पडणाऱ्या आमदार मोहनराव कदम यांना कोरोनाची लागण होणे धक्कादायक आहे. आमच्या नजीकच्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, शिवाय किमान आठवडाभर विलगीकरणात रहावे असे अवाहन शांताराम कदम केले आहे. दरम्यान, बंधू डॉ. हणमंतराव  कदम कोरोनामुक्त होऊन १६ ऑगस्टरोजी घरी परतले आहेत, अशी माहितीही शांताराम कदम यांनी दिली. आमदार मोहनराव कदम यांची प्रकृती ठणठणीत

आमदार मोहनराव कदम यांची प्रकृती ठणठणीत आहे. दक्षता म्हणून त्यांना भारती हॉस्पिटल, पुणे येथे उपचारासाठी दाखल केले आहे. ते लवकरच बरे होऊन  पुन्हा जनतेच्या सेवेसाठी सक्रिय होतील. आमची व सर्व कुटुंबियांची व संपर्कात आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृतीही ठणठणीत आहे असे शांताराम कदम यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSangliसांगलीMohanrao Kadamमोहनराव कदम