सांगली : शहरातील साखर कारखान्यासमोर कोयत्याच्या धाकाने लुटणाऱ्या दोघा अल्पवयीनांसह चाैघांना शहर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. सोहेल राजेसाब गलगले (वय २४, रा. अभिनंदन कॉलनी, सांगली) आणि विशाल बाबुराव रणदिवे (१९, रा. चिन्मय पार्कजवळ, यशवंतनगर,सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. संशयितांनी लुटमारीसह चायनिज सेंटरही फोडल्याची पोलिसांसमोर कबुली दिली.माहुली (ता. खानापूर) येथील सुरज भिमराव फाळके हे गावी जात असताना त्यांना माधवनगर रस्त्यावरील साखर कारखान्यासमोर अडवून कोयत्याने लुटले होते.शहर पोलिसांचे पथक गस्तीवर असताना, त्यांना माहिती मिळाली की, संशयित हे चोरीच्या दुचाकी विक्री करण्यासाठी जूना बुधगाव रस्त्यावरील वाल्मीकी आवासमध्ये येणार आहेत. त्यानुसार पथक तिथे गेले. पोलिसांना बघून संशयित पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच चौघांना पाठलाग करून पकडण्यात आले. यावेळी त्यांच्याकडे चोरीच्या तीन दुचाकीसह रोकड असा एक लाख ८५ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सांगली शहरचे निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, विनायक शिंदे, गौतम कांबळे, संतोष गळवे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
Sangli: कोयत्याच्या धाकाने लुटणारे चौघेजण जेरबंद, पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
By शरद जाधव | Published: November 04, 2023 6:18 PM