शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

Sangli: थांबलेल्या ट्रॅक्टरला भरधाव ट्रकची धडक, चिमुकलीसह चौघे ऊसतोड मजूर ठार; १० जण जखमी

By हणमंत पाटील | Published: April 02, 2024 12:32 PM

ऊसतोडणी संपवून कुटुंबासह घरी परतताना मजुरांवर काळाचा घाला

महेश देसाई कवठेमहांकाळ: ऊसतोडणीचं काम संपवून घराकडे परतताना रस्त्यालगत थांबलेल्या ट्रॅक्टरला भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत चिमुकलीसह चौघां ऊसतोडणी मजुरांचा मृत्यू झाला. तर तब्बल 10 जण जखमी झाले. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अगळगाव फाटा येथे आज, मंगळवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिसात झाली आहे.शालन दत्तात्रय खांडेकर (वय 30, रा. शिरनांदगी), लगमा तम्मा हेगडे (35), दादा आप्पा ऐवळे (17), निलाबाई परशुराम ऐवळे (3, रा. चिक्कलगी ता. मंगळवेढा जि. सोलापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  याबाबत माहिती अशी की, मंगळवेढा तालुक्यातील काही मजूर हे शिरोळ परिसरात ऊस तोडणीसाठी काही महिन्यांपूर्वी आले होते. यंदाचा गळीत हंगाम संपवून काही मजूर गावाकडे परतत होते. मध्यरात्री दोन वाजता ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाला, त्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला उभा करुन दुरुस्त केला जात होता.

दरम्यान, पाठीमागून आलेल्या ट्रकनं पाठिमागून ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. या धडकेत शालन खांडेकर, लगमा हेगडे, दादा ऐवळे, निलाबाई ऐवळे यांचा जागीच मृत्यू झाला आणि 10 जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी मिरज या ठिकाणी पाठवण्यात आले.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातsugarcaneऊस