शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

मोफत धान्यवाटप कमिशनवर डल्ला, प्रशासन-सेल्समनचे संगनमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 1:24 PM

दत्ता पाटील तासगाव : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात शासनाने अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना मोफत धान्य ...

दत्ता पाटीलतासगाव : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात शासनाने अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप केले. धान्य वाटपाच्या मोबदल्यात प्रतिकिलोला दीड रुपया कमिशन शासनाकडून देण्यात आले. मात्र, या कोट्यवधी रुपयांच्या कमिशनवर डल्ला मारण्याचा कारनामा चव्हाट्यावर आला आहे.प्रशासनाने टक्केवारीच्या मोबदला घेत, सेल्समनसोबत संगनमत केले. शासनाकडून आलेले कमिशन स्वस्त धान्य दुकानाचा परवाना असलेल्या संस्थेच्या नावावर जमा करण्याऐवजी त्या संस्थेत नोकरी करणाऱ्या सेल्समनच्या खात्यावर थेट वर्ग केले आहे. विशेष म्हणजे याबाबत संस्थाचालक अनभिज्ञ आहेत. यात मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे.कोरोना काळात राज्य शासनाने अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय शिधापत्रिकाधारक आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना मदतीचा हात दिला. पहिल्या टप्प्यात १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत जिल्ह्यात चार लाख सहा हजार ४०७ शिधापत्रिकाधारक, १८ लाख ४७ हजार ४८० लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ देण्यात आला. अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना २५ किलो गहू आणि १० किलो तांदूळ दिले. या धान्य वाटपाचा मोबदला म्हणून शासनाकडून स्वस्त धान्य दुकानांना किलोला दीड रुपया कमिशन देण्यात आले.जिल्ह्यात एप्रिल ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत धान्य वाटपाच्या मोबदल्यात  प्रशासनाने १० कोटी ५४ लाख आठ हजार ४७ हजार रुपयांचे कमिशन वर्ग केले. मात्र, या वाटपातच गौडबंगाल झाल्याचा प्रकार दुसऱ्या टप्प्यातील अनुदान वाटपावेळी चव्हाट्यावर आला आहे. प्रशासनाने हे कमिशन धान्य दुकानाचा परवाना असणाऱ्या संस्थांच्या नावावर वर्ग करणे आवश्यक होते. मात्र, जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ते संस्थांच्या ऐवजी, संस्थेत नोकरी करणाऱ्या सेल्समनच्या नावावर वर्ग करण्यात आले आहे. दुसऱ्या  टप्प्यात संस्थेच्या ना हरकत पत्राची मागणी झाली. त्यामुळे कमिशनमधील ही अनियमितता चव्हाट्यावर आली. जिल्हा पुरवठा विभागाने तालुकास्तरावरून आलेल्या माहितीनुसार अनुदान वर्ग केल्याचे सांगून त्यांची जबाबदारी झटकली आहे. मात्र तालुकास्तरावरून संस्थेऐवजी सेल्समनच्या खात्यांची माहिती गेलीच कशी, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.२५ टक्क्यांची चर्चाजिल्ह्यात सुमारे १७०० स्वस्त धान्य दुकाने आहेत. यापैकी ७० दुकाने संस्थांच्या माध्यमातून चालवली जातात. एकट्या तासगाव तालुक्यात ९७ दुकाने आहेत. त्यापैकी संस्थांची ४८, बचत गटांची १६, ग्रामपंचायतीचे एक आणि ३२ खासगी परवानाधारक दुकाने आहेत. संस्थेऐवजी सेल्समनच्या नावावर कमिशन जमा करण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक सेल्समनकडून २५ टक्के रक्कम गोळा करून अधिकाऱ्यांचे खिसे गरम केल्याची चर्चा आहे. या संगनमतामुळेच वर्षभरापासून याबाबत कोणालाच थांगपता लागला नाही.रक्कम जमा करण्यासाठी तगादाधान्य वाटप करणाऱ्या संस्थांनी आता संबंधित सेल्समनना कमिशनची रक्कम संस्थेत भरण्यासाठी तगादा लावला आहे. काही सेल्समनना नोटीस बजावली असून रक्कम न भरल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.पहिल्या टप्प्यात दुकानांना मिळालेले तालुकानिहाय कमिशन...-    सांगली : १ कोटी २९ लाख ७ हजार ११९-    मिरज : १ कोटी २६ लाख ३५ हजार ६२३-    कवठेमहांकाळ : ६६ लाख ७९ हजार ८१०-    तासगाव : एक कोटी एक लाख ८९ हजार ६९-    आटपाडी : ६१ लाख ४६ हजार १५७-    जत : एक कोटी ३८ लाख २५९-    कडेगाव : ६४ लाख ९० हजार ९०५-    खानापूर : ७० लाख ६८ हजार ९०९-    पलूस : ७२ लाख ३६ हजार ७३३-    वाळवा : एक कोटी ५३ लाख ५८ हजार ८१९-    शिराळा : ६८ लाख ९५ हजार ६९-    एकूण : १० कोटी ५४ लाख ८ हजार ४७५

टॅग्स :Sangliसांगली