या प्रकरणी सुधाकर शिवाजी खरात (वय ३८, रा. संजयनगर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना बुधवारी, २३ डिसेंबर रोजी घडली होती. योगेश याला रायबाग येथील शिवशक्तीनगरमधून साखर भरून घेऊन पोहोच करण्याचे भाडे मिळाले होते. त्याला खरात यांच्या सांगण्यावरून अमोल ओलेकर यांनी ट्रकमध्ये डिझेल भरण्यासाठी व साखर पोती खाली करण्यासाठी ४५ हजार रुपये दिले होते. हे पैसे घेऊन योगेश कोणालाही काही न सांगता निघून गेला. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार देण्यात आली आहे.
-------
शिलाईच्या पैशावरून दोघांना मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अंकली (ता. मिरज) येथे शिलाईचे पैसे मागितल्याच्या कारणावरून आई व मुलीला चौघांनी शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राणी घळगे, आदित्य घळगे, अजय घळगे व समीर (पूर्ण नाव नाही) अशी चौघांची नावे आहेत. या प्रकरणी कविता शंकर लोहार (वय ३९) यांनी फिर्याद दिली आहे. कविता यांची मुलगी वैष्णवी ही राणी घळगे यांच्या घरी शिलाईचे पैसे घेण्यासाठी गेली होती. राणी यांनी तिला १६० रुपये दिले. घरी आल्यानंतर हिशेब चुकल्याने कविता व वैष्णवी या दोघी राणी यांच्या घरी गेल्या. त्यांनी हिशेब समजावून सांगून २६० रुपये मागितले. यावेळी राणी यांनी कविता यांना शिवीगाळ केली, तर आदित्य याने काठीने मारहाण केली. वैष्णवी हिलाही शिवीगाळ करीत ढकलून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
-----
वीज चोरीप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सिद्धेवाडी (ता. तासगाव) येथे हुक टाकून विजेची चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप शहाजी चव्हाण (वय ४०, रा. सिद्धेवाडी) असे संशयिताचे नाव आहे.
याप्रकरणी महावितरणकडील कर्मचारी प्रियांका प्रवीण वसावे (वय २६) यांनी फिर्याद दिली आहे. संदीप याने लाकडी कळकाचा बांबू वापरून त्याला केबलचा हुक तयार करून गेल्या तीन महिन्यांपासून वीज चोरी केली आहे. या विजेचा दूध डेअरीसाठी वापर केला असून एकूण २ लाख ४९० रुपयांची वीज चोरी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.