उद्योजक अशोक पाटील यांनी राजकीय हेतू डोळ्यासमा न ठेवता सामाजिक भावनेतून सामाजिक विविध घटकातील गरजू कुटुंबांना जगण्याचा आधार देऊन त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम केले आहे. शिक्षण घेण्याची जिद्द असणाऱ्या परंतु पैशाअभावी शिक्षण घेता येत नसणाऱ्या होतकरू विद्यार्थिनींना शिक्षण घेण्याचे बळ ही पाटील यांनी दिले.
दिवसेंदिवस वाढत्या महागाईने गोरगरीब सामान्य जनतेला औषधांचा व दवाखान्याच्या खर्च करण्यास परवडत नाही. अशा जनतेसाठी अशोक पाटील यांनी युवक क्रांती ग्रुपच्या सहाय्याने रक्तदान व सर्वरोग निदान शिबिर घेऊन सामान्य जनतेला आरोग्याचा आधार दिला. कोरोनाच्या काळात रक्ताची दिवसेंदिवस कमतरता भासत आहे. त्यामुळे अशोक पाटील यांच्या वाढदिनी सर्वरोग निदान शिबिराबरोबरच रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. गरजू नागरिकांना सर्वरोग निदान शिबिराचा लाभ झाला पाहिजे या उद्देशाने शिबिराचे आयोजन केले असल्याचे पाटील यांनी सांगितले.