रेठरे धरण येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १च्या प्रांगणात हे कोविड सेंटर उभे करण्यात आले आहे. सध्या हॉस्पिटलमध्ये बेड मिळणे मुश्कील बनले आहे. कोरोना रुग्ण भीतीने गर्भगळीत होत असून त्यांना विश्रांती, योग्य आहार व उपचाराची गरज असते. हे ओळखून गृहविलगीकरणामध्ये ठेवण्याऐवजी कोविड सेंटरमध्ये ठेवण्यासाठी अमोल पाटील युवाशक्ती यांच्यावतीने हे ३५ बेडचे कोविड केअर सेंटर उभे केले आहे.
ज्यांना कोरोनाची सामान्य लक्षणे आहेत, तसेच ज्यांच्या घरात विलगीकरणाची सोय नाही अशा लोकांना या कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे. ३५ बेड, शौचालय, बाथरुम, पंखे, मुबलक पाणी, तसेच मनोरंजनासाठी टीव्हीची सोय करण्यात येणार असून, सर्व रुग्णांना चहा, नाश्ता व दोन वेळचे जेवण मोफत देण्यात येणार आहे.
येथील रुग्णांची तपासणी करण्यासाठी वेळेनुसार सरकारी डॉक्टर तसेच नर्स, अमोल पाटील युवाशक्तीचे युवक परिश्रम घेणार आहेत. प्रथम रेठरे धरण येथील लोकांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे.