लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपुरातील प्रभाग क्रमांक १२च्या वतीने आयोजित केलेल्या मोफतनंतर तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात १२० जणांची नंतर तपासणी झाली. २० व्यक्तींवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानाअंतर्गत या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत.
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग १२च्या वतीने आयोजित शिबिराचे उद्घाटन
राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. श्यामराव पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक खंडेराव जाधव, बूथ अध्यक्ष रणजित गायकवाड प्रमुख उपस्थित होते. इस्लामपूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शहाजी पाटील, शिरीष शिंदे, शहर राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी शिबिरास भेट दिली. यावेळी गोमटेश नागरी सह पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजू देसाई यांचा सत्कार करण्यात आला. भूषण शहा, अभिनंदन देसाई, नाजीम खाटीक, बबलू भादी, रघुनाथ मदने, सुभाष गायकवाड, सुधन गायकवाड, राजेंद्र गायकवाड जयंत नेत्रालयचे कर्मचारी, जयंत दारिद्र्य निर्मूलनचे राजाराम जाधव, जगताप उपस्थित होते.
रणजीत गायकवाड,आयुब हवालदार, जुबेर खाटीक, वासिम मुल्ला, सचिन चव्हाण, संजय जाधव, सुरेश कलगुटकी यांनी शिबिराचे नियोजन केले.