शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
2
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
3
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
4
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
5
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
6
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
7
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
8
"असं केलं, तर महाराष्ट्रात आरक्षणाचा वाद राहणार नाही", शरद पवारांनी काय सुचवला मार्ग?
9
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला
10
MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक
11
मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; शरद पवारांनी केंद्राचे केले अभिनंदन, म्हणाले...
12
'गोलीगत' सूरजसाठी सुप्रिया सुळे मैदानात! बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केलं आवाहन
13
करामती Rashid Khan 'ते' वचन विसरला! क्रिकेटरनं ३ भावांसह एकाच मांडवात उरकलं लग्न
14
मोदी सरकारची नवी स्कीम, १ कोटी तरुणांना महिन्याला ₹५००० मिळणार; कधी, केव्हा, कसा कराल अर्ज?
15
मराठी भाषेला अभिजात दर्जा, राज ठाकरेंनी केलं स्वागत; या निर्णयाचा फायदा सांगितला
16
Bigg Boss 18: बॉलिवूड सुंदरी घेणार घरात एन्ट्री, ९० च्या दशकातील ही 'सेन्सेशनल क्वीन' कोण?
17
इस्त्रायलची मोठी कारवाई! बेरुतही स्फोटांनी हादरला, हिजबुल्लाहचा नवा चीफ सफीद्दीन टारगेटवर
18
संपादकीय: इराणने का उडी घेतली? पडसाद अमेरिकेतील निवडणुकीत
19
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
20
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ

संचारबंदीतील परिस्थितीला आर्थिक झळ कमी;  मोफत गॅस सिलेंडरमुळे झाली मोठी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 6:02 PM

या योजनेचा लाभ घेतलेल्या नविन रेल्वे स्टेशन रोड, सांगली येथील सारिका सुहास माने म्हणाल्या, आमचे कुटुंब 6 जणांचे असून आमच्या घरातील पुरुष गवंडी काम करीत असून कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आमची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे.

सांगली  : कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत सिलेंडर देण्यात येत आहे. संचारबंदीतील परिस्थितीला आर्थिक झळ कमी बसावी म्हणून शासनाने गरीब व आरोग्य सेवा कामगारांसह प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 1 एप्रिल ते 30 जून 2020 या तीन महिन्याच्या कालावधीत मोफत एलपीजी गॅस सिंलेडर देण्याची तरतूद केली आहे.

या योजनेचे जिल्ह्यात 1 लाख 11 हजार 177 लाभार्थी असून 1 एप्रिल पासून आजअखेर 52 हजार 679 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. या योजनेचा लाभ घेतलेल्या नविन रेल्वे स्टेशन रोड, सांगली येथील सारिका सुहास माने म्हणाल्या, आमचे कुटुंब 6 जणांचे असून आमच्या घरातील पुरुष गवंडी काम करीत असून कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आमची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे.

प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत 730 रूपये इतकी रक्कम सासुंच्या नावे जमा झाली असून त्यातूनआम्ही गॅस घेतला आहे. त्यामुळे शासनाचे खुप खुप आभारी आहे. याच भागातील शोभा आण्णा पवार म्हणाल्या, लॉकडाऊनमुळे आमची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत 730 रूपये इतकी रक्कम जमा झाली असून त्यातून मी गॅस घेतला आहे. या योजनेंतर्गत उज्वला ग्राहकांच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्याच्या 14.2 किलो रिफिलच्या किंमतीएवढे (RSP) समान रक्कमेची आगाऊ रक्कम जमा करण्यात येते. 14.2 किलोच्या महिन्याला 1 असे 3 महिन्यात 3 रिफीलची तरतूद आहे. ज्या उज्वला ग्राहकांकडे 5 किलोचे सिलेंडर आहे त्यांना महिन्याला 3 तर योजनेच्या अवधीमध्ये फक्त 8 रिफिलची तरतूद आहे. या योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी त्यांना प्राप्त झालेल्या रक्कमेतून सिलेंडर घेतला नाही तर त्यांना पुढील महिन्यात आगाऊ रक्कम मिळणार नाही. आगाऊ रक्कम मिळण्यासाठी ग्राहकांने त्यांचे बँक खाते चालू असण्याबाबत खात्री करणे आवश्यक आहे. ज्या पात्र लाभार्थ्यांना आगाऊ रक्कम मिळाली नाही त्यांनी गॅस वितरकांशी संपर्क साधावा किंवा ऑइल कंपनीच्या हेल्पलाईन

- एच पी गॅस/ इंडेन गॅस18002333555, भारत गॅस 1800224344 या क्रमांकावर संपर्क साधावा आणि आधार लिंक नझाल्याबाबतची कारणे जाणून घेवून त्या बाबत आपल्या बँकेत जावून सुधारणा करून घ्यावी.

टॅग्स :Sangliसांगली