ओळ : शिराळा येथे नगरपंचायतीमार्फत दिव्यांग नागरिकांच्या लसीकरणासाठी मोफत रिक्षाची सोय करण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा शहरातील दिव्यांग बांधवांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात राखीव दिवस ठेवण्यात आला होता. यासाठी नगरपंचायतीमार्फत दिव्यांग नागरिकांना घरापासून उपजिल्हा रुग्णालयापर्यंत मोफत रिक्षाची सोय करण्यात आली होती. शनिवारी ४० दिव्यांग नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
मुख्याधिकारी योगेश पाटील म्हणाले, ‘‘दिव्यांग बांधवांना काेविड प्रतिबंधक लस घेण्यासाठी नगरपंचायतमार्फत मोफत रिक्षा उपलब्ध करून देण्यात आली होती. यासाठी नगरपंचायतचे कर्मचारी नितीन कुरणे, लक्ष्मण मलमे, अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. अजूनही काही दिव्यांग नागरिकांचे लसीकरण झालेले नाही. त्यांच्यासाठीही मोफत रिक्षा सेवा देण्यात येणार आहे.’’