या केअर सेंटरमध्ये २० ऑक्सिजन बेड आहेत. आतापर्यंत ३१० रुग्ण येथे उपचार घेऊन काेराेनामुक्त झाले आहेत. गावातील रुग्णांवर उपचार आपल्याच गावात मोफत व्हावेत यासाठी आरग येथील व्यापारी संघटनेसह ग्रामस्थांनी आर्थिक मदत केली आहे. आरगमधील डॉक्टरांच्या विनामूल्य सेवेच्या कार्याचे, निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
चौकट
कोविड रुग्णांना मोफत सेवा देणारी टीम
डॉ. प्रवीण पाटील (आरग), डॉ. निर्मला कुंभार (आरग), डॉ. विवेक जाधव, डॉ. अभिषेक साळगावकर, डॉ. महावीर लिंबेकाई (बेडग), डॉ. निखिल चौगुले (बेडग), डॉ. संतोष पाटील (बेडग), डॉ. हमीदपाशा मुजावर (आरग), डॉ. दादासाहेब मकानदार (आरग), डॉ. विश्वजित थोरात (आरग), बबन धायगुडे (लिंगनूर), अमोल जाधव (आरग), रविकिरण पाटील (आरग), डॉ. राजेंद्र शेंडगे, डॉ. बाबासाहेब खोत (लक्ष्मीवाडी).
प्रतिक्रिया.
काेराेनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आम्ही डॉक्टर व आमची टीम कोणताही आर्थिक मोबदला न घेता शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, कोरोनाविषयक सर्व नियम पाळून सेवा देत आहोत; हीच खरी सेवा आहे.
- डॉ. बबन धायगुडे, लिंगनूर