शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

पाण्यासाठी शिराळ््यामध्ये मोर्चा

By admin | Published: March 07, 2017 11:58 PM

कॉँग्रेस, राष्ट्रवादीतर्फे आंदोलन : लोकप्रतिनिधी व पाटबंधारे विभागावर आंदोलनकर्त्यांचा संताप

शिराळा : तालुक्यातील उत्तर भागासह विविध गावांमध्ये निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व तालुक्यातील शेतकऱ्यांच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या भागाला तातडीने पाणी न मिळाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला. कृषी उत्पन्न बाजार समितीपासून मोर्चास सुरुवात झाली. आंदोलनाचे नेतृत्व माजी आ. मानसिंगराव नाईक, कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी केले. यावेळी पंचायत समिती सभापती सम्राटसिंह नाईक, विराज नाईक, अशोकराव पाटील सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांसमोर बोलताना मानसिंगराव नाईक म्हणाले की, वाकुर्डे योजनेचे पाणी शेतीपेक्षा औद्योगिक विभागातील कारखानेच जास्त वापरतात. मात्र याचे बिल शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे. पाण्यावर पहिला हक्क पिण्यासाठी, नंतर शेती आणि शेवटी औद्योगिक वापरासाठी करायचा असताना, आज तालुक्यातील उत्तर भाग पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडत आहे. सर्वस्वी जबाबदार लोकप्रतिनिधी व पाटबंधारे विभाग आहे. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हणमंतराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, जि. प. सदस्या आशा झिमूर, बाबालाल मुजावर, सुनंदा सोनटक्के, हिंदुराव बसरे, नारायण चव्हाण, चंद्रकांत पाटील, बाबासाहेब पाटील, रवींद्र पाटील, संपतराव देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी जि. प. सदस्या अश्विनी नाईक, शुभलक्ष्मी नाईक, राजेंद्र नाईक, विश्वप्रताप नाईक, बाळासाहेब पाटील, पं. स. सदस्य अमर पाटील, माया कांबळे, सुरेश पाटील, डॉ. राजाराम पाटील, पी. वाय. पाटील यांच्यासह महिला, शेतकरी उपस्थित होता. माजी जि. प. सदस्य के. डी. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विश्वास पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)पाण्याचा ५0 टक्केपेक्षा जास्त वापर औद्योगिक वापरासाठीच होतोयशेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याअगोदर बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. शेतकरी व औद्योगिक यांना वेगळा न्याय का? असाही सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस आघाडी सरकारने वाकुर्डे योजनेस निधी दिला. त्यामुळे या योजनेचे पाणी मोरणा धरण तसेच मांगलेपर्यंत पोहोचले. मोरणा धरण बांधताना औद्योगिक क्षेत्रासाठी पाणी उपलब्धतेचा विचार केला गेला नाही. करमजाई तलावात पाणी आल्याने उत्तर भागास पाणी मिळत आहे. या तलावातून पिण्याच्या पाण्याचे नियोजन न करता सर्व पाणी सोडून दिले. त्यामुळे या पाणी टंचाईस पाटबंधारे विभाग जबाबदार आहे. त्याचबरोबर वाकुर्डेच्या वीज बिलाचे भूत शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसविले आहे. मात्र या पाण्याचा ५0 टक्केपेक्षा जास्त वापर औद्योगिक वापरासाठी होतो. त्यांच्याकडून औद्योगिक दराने पाणीपट्टी वसूल करा, नंतर शेतकऱ्यांची वीज कनेक्शन्स तोडण्याची भाषा करा. शेतकऱ्यांना जपण्याची व सांभाळण्याची भूमिका लोकप्रतिनिधींनी ठेवावी. शेतकरी वीज बिल भरण्यास तयार आहेत, मात्र प्रथम औद्योगिक संस्थांची वीज बिले भरुन घ्या, असे मानसिंगराव नाईक यांनी सांगितले.उग्र आंदोलन करुजि. प. सदस्य सत्यजित देशमुख म्हणाले, हा मोर्चा म्हणजे पहिला इशारा आहे. जर आठ दिवसात पाणी मिळाले नाही, तर उग्र आंदोलन करु. करमजाई तलावातील पाणी जि. प., पं. स. निवडणुकीत विजय मिळावा यासाठी तर सोडले नाही ना? टेंभू, म्हैसाळ या योजनेचे वीज बिल जसे टंचाईग्रस्त म्हणून शासन भरते, त्याप्रमाणे येथील बिलही शासनाने भरावे, अशी मागणी त्यांनी केली.